आंबा मोहोर संरक्षण, फळबाग व्यवस्थापन कार्यशाळा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पालघर, ता. १७ (बातमीदार) ः शेतकऱ्यांसाठी आगरवाडी परिसर सेवा विकास मंडळ व पालघर कृषी विभागातर्फे आंबा मोहर संरक्षण व फळबाग व्यवस्थापन कार्यशाळा रोजी आयोजित केली होती.
या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील शास्त्रज्ञ उत्तम सहाने यांनी आंबा व फळ झाडांवरील फवारणी, कीटकनाशके त्यांच्या मात्रा, फवारणीच्या वेळा, फळमाशीचा प्रादुर्भाव, आंब्यामध्ये एकाच वेळी मोहर येण्यासाठी करावयाची फवारणी, पुनर्मोहोर निघण्याची समस्या, फळांची गळ, त्याची कारणे व त्यावरील उपाय आदीबाबत त्यांनी मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी आंबा पीक विमा योजना, भात पीक विमा योजना, शेततळे ट्रॅक्टर अनुदान, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष चिंतामण ठाकूर यांनी केले. या वेळी मंडळाचे संस्थापक गोपीनाथ वर्तक, सदस्य नितीन वर्तक, मंडळाचे खजिनदार रमाकांत चौधरी व शेतकरी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares