कृषी विभागाकडून २०० शेतकऱ्यांना मस्त्यबीज वाटप – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कासा, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुका कृषी विभागामार्फत आत्मा योजनेंतर्गत बुधवारी राज्य मध्यवर्तीय रोपवाटिका दापचरी येथे २०० शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप करण्यात आले. डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, राजेश सुतार, पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मस्यबीज वाटप करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मत्स्यबीजाची काळजी, त्यांचे खाद्य याबाबतीत माहिती दिली. तसेच कोणतीही समस्या असल्यास कृषी विभागाचा कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या वेळी जवळपास २०० लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन डबे मस्त्यबीज दिले. या वेळी सुनील बोरसे, मंडळ कृषी अधिकारी उमेश पवार, सुनीता सरगर, अशोक महाले, राहुल गायकवाड, कृषी अधिकारी ध्रुवत ठाकरे, कृषी यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares