तुमची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी आलोय; राहुल गांधींचा मोदींना अप्रत्यक्ष टोला – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यासाठी आलोय, असा टोला कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नाव न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यासाठी आलोय, असा टोला कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नाव न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. तसेच, ‘भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. (Congress MP Rahul Gandhi Slams PM Narendra Modi In Bharat Jodo Yatra)
जांबरून फाटा येथून सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली आणि वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे पदयात्रेची सांगता चौकसभेने झाली. जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे. या पदयात्रेत दररोज हजारो लोक भेटून त्यांच्या समस्या सांगतात. तरुण मुले मुली शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. शेतकऱ्याच्या शेतमलाला भाव मिळत नाही. काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यासाठी आलोय”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी लोकांना जोडण्याचे काम केले. सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे काम केले. या महापुरुषांनी जाती धर्मात भांडणे लावले नाहीत. द्वेष पसरवला नाही. आम्ही सुद्धा या पदयात्रेच्या माध्यमातून त्या॔नी घालून दिलेल्या मार्गानेच भारत जोडण्याचे काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही यात्रा आहे. ही पदयात्रा सर्वांना बरोबर घेऊन चालत आहे. शेतकरी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांची जात वा धर्म न विचारता यात्रा सुरू आहे. सर्व जण एकाच ध्येयाने निघाले आहेत ते म्हणजे, नफरत छोडो, भारत जोडो”, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
त्याशिवाय, “महागाईने जनता त्रस्त असून, बेरोजगारीने तरुणवर्ग चिंतेत आहे. शेतमाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आर्थिक संकटात आहे. मोदी सरकारच्या राजवटीत कोणताही घटक समाधानी नाही. देशात समस्या मोठ्या आहेत. पण नरेंद्र मोदी त्याकडे लक्ष देत नाहीत. दोन तीन लोकांसाठीच ते काम करतात. नोटबंदी व जीएसटीने सर्वांना उद्ध्वस्त केले आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
हेही वाचा – स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल…; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares