Agitation : ऊस दरावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, बेळगावच्या साखर आयुक्तालयाला ठोकलं टाळे – ABP Majha

Written by

By: विलास अध्यापक, एबीपी माझा | Updated at : 17 Nov 2022 06:00 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Rayat Kranti Sanghatana
Rayat Kranti Sanghatana : दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन  5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी  साखर कारखानदारांनी एकजूट केली असून, त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. साखर आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्यानं रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयास टाळे ठोकले. 
यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना लोटला तरी शेतकऱ्यांसह रयत संघटनेच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सहकारमंत्र्यांनी कारखानदारांना दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असे आदेश देऊनही कारखानदारांनी याकडं दुर्लक्ष करत गळीत हंगाम सुरुच ठेवला आहे. तसेच राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या साखर कारखानदारांनी ऊस दरप्रश्नी मौन बाळगलं असल्याचा आरोप रयत संघटनेतर्फे करण्यात आला आहे. 
महिनाभर आंदोलन करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहकार मंत्र्यांनी अद्याप याबाबत योग्य तोडगा काढला नाही. त्यामुळं संतापलेल्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. यावेळी साखर आयुक्त नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तालयास टाळे ठोकले. त्यानंतर साखर कारखानदार तसेच सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन तीव्र होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

Reels
महत्त्वाच्या बातम्या:
Custard Apple : सफरचंदापेक्षाही महाग सीताफळ; डझनचा दर तब्बल 300 ते 400 रुपयांवर 
Aurangabad: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचे औरंगाबादमध्येही पडसाद, ऊस वाहतूक अडवली
Rahibai Popere : अतिवृष्टीचा बीजमाता राहीबाईंना फटका, तब्बल तीन वेळा केली भाजीपाल्याची लागवड 
Marathwada: मराठवाड्यात 34 टक्के रब्बीची पेरणी पूर्ण, कृषी विभागाची माहिती
Agriculture : विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ 
Maharashtra Cabinet : नोकरभरतीसाठी आता ‘या’ कंपन्या, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; कॅबिनेटचे 15 महत्वाचे निर्णय
Bharat Jodo: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाकोळण्यासाठीच राज्यात रोज एक नवा वाद? काय आहे घटनाक्रम?
Mumbai News: अतिप्रसंग झाल्याने प्रेयसीने जीवन संपवले; न्यायासाठी प्रियकराने मंत्रालयात उचलले टोकाचे पाऊल
IRFC Share Price: फक्त 37 कर्मचारी असलेल्या रेल्वे कंपनीच्या ‘या’ शेअरमध्ये मोठी तेजी
Expensive Tea: चहा पावडर एवढी कुठं महाग असते का? एक किलोसाठी मोजावे लागतात 9 कोटी

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares