Rahul Gandhi : …तर, भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी राहुल गांधींचे आव्हान – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Nov 2022 01:10 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना मराठीतून बोलण्याचा आग्रह केला. सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. तसेच आमची यात्रा रोखून दाखवा, असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं. जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
पैशांचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत. सध्या सर्वाचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे. देशात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्याचे गांधी म्हणाले. विदर्भातील शेतकरी समस्येत असताना आमच्या सरकारनं त्यांना मदत केल्याचे राहुल गांधी म्हणाले. ही यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारच असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 
सत्ताधारी पक्षाकडून न्याय व्यवस्थेवर दबाब आणला जात आहे. देशात वेगवेगळ्या समस्या आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी भारत जोडो यात्रेशिवाय पर्याय नसल्याचे गांधी म्हणाले. सध्या देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याचे गांधी म्हणाले. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे, तसेच आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याचे गांधी यावेळी म्हणाले. सरकारी शाळा, सरकारी दवाखाने नाहीत असे गांधी म्हणाले. 

Reels
यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचे वाचन केले. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ते पत्रही दाखवले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा माफीमाना वाचावा असे गांधी म्हणाले. माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं. सरकारला जर वाटलं ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी असेही गांधी म्हणाले. आम्हाला भारत जोडायचा आहे. आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली आहे. आता आम्हाला श्रीनगरपर्यंत जायचे असल्याचं गांधी म्हणाले. 
 
 
Maharashtra News Updates 17 November 2022 :राज्यात मुंबई, भिवंडी आणि मालेगावात गोवर आजाराचा उद्रेक
Nashik: मित्राच्या आत्महत्येनंतर गायब दिपकचा मृतदेह सापडला, गोदापार्कच्या दारू पार्टीत नेमकं काय घडलं? 
Nashik Car Accident : नाशिकमध्ये मद्यधुंद ‘साहेबरावा’चा ‘कार’नामा! अनेक वाहनांना उडवलं, टायर फुटलं तरी थांबेना, चार जखमी
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार? पुन्हा चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यू कोर्टात
Samruddi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांना ‘समृद्ध’ करणारा निर्णय? बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडासंदर्भातील आदेश रद्द
Mumbai Police: पश्चिम बंगालच्या सीआयडी अधिकाऱ्यासह चार जणांना मुंबईत अटक, व्यापाऱ्याकडून पैसे उकळ्याच्या आरोप
Measles Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?
IND vs NZ, Weather Reoport : वेलिंग्टनमध्ये रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टी20, पण पाऊस व्यत्यय आणणार का?
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनो तयार राहा! राज्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Artillery Gun: तोफांच्या निर्यातीसाठी आता भारत सज्ज, संरक्षण क्षेत्रातील 1261 कोटी रुपयांची एक्सपोर्ट ऑफर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares