गुरूकुंज मोझरी येथे प्रहारचे ‘मुक्काम’ आंदोलन: शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी पावित्रा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
नवनिर्मित गुरूकुंज उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचत नसल्याने हक्काच्या पाण्यासाठी भेडसावत असलेल्या विविध समस्येच्या निराकरणासाठी गुरूवारी (दि. १७) प्रहारच्या वतीने शेतकऱ्यांसह गुरूकुंज गुरूकुंज मोझरी येथील दासटेकडी स्थित असलेल्या कंपनीच्या कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत मुक्काम आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना वरदान ठरणारी ही योजना साकारण्यासाठी व या योजनेच्या निर्मितीसाठी प्रहारच्या वतीने मागील १९ वर्षांपासून सतत पाठपुरावा करून व अथक परिश्रम घेवून ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे लागली. आज ही योजना पूर्णत्वास आल्यानंतर ऐन रब्बी हंगाम सुरू होत असतानाच शेतीला पाण्याची गरज असताना या प्रकल्पात चोरी होणे, त्यानंतर पाण्याची पाईपलाईन फुटणे आदी प्रकारांमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिलेले आऊटलेट (कुंड्या) सखल भागात दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उंच भागावर पाणी कसे पोहचवावे हा देखील प्रश्न आहे. काही शेतात भरपूर कुंड्या दिल्या, तर काहींना एकाच कुंडीवर समाधान मानावे लागत आहे. परिणामी काही ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात जाते तर काही ठिकानी काहीच जात नाही हा देखील प्रश्न आहे. योजना नियमित, सुरळीत सुरूच व्हायच्या आधी पाणी पोहचवणारी पाईपलाईन फुटली. आताच जर अशी अवस्था आहे, तर पुढे कसे आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, अनेक प्रश्न प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या समोर मांडून सोडविण्यासाठी प्रहार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरूवारपासून हे मुक्काम आंदोलनास दासटेकडी येथे सुरू करण्यात आले आहे.
या वेळी प्रहारचे संजय देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात कडाक्याच्या थंडीत या आंदोलनात सहभागी झाले असून तिवसा पोलिस यंत्रणा देखील मुक्काम आंदोलनस्थळी उपस्थित होती. वृत्तलीहेस्तोवर हे आंदोलन सुरूच होते. कुठल्याही अधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares