नुकसान भरपाई: विमा अग्रिम, अतिवृष्टी मदतीसाठी किसान सभेचे उद्या शिमगा आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकऱ्यांचे विमा अग्रिम व अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी परळी तालुका कृषी कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने मंगळवारी (दि.२५) शिमगा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव मुरलीधर नागरगोजे यांनी दिली.
सातत्याने संपूर्ण जिल्ह्यातच अतिवृष्टी होत असून आधीचा सततचा पाऊस, त्यानंतरचा पावसातील मोठा खंड आणि वेगवेगळ्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव या तावडीतून जे काही वाचलेले पीकही आताच्या या अतिवृष्टीने पुरते हातून गेले आहे. अशा अवस्थेत अगोदर घोषित केलेले पंचवीस टक्के पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांच्या पदरात अजून पडलेले नाही. अधिसूचना निघाल्यावर एक महिन्यात अग्रिम मिळणे अपेक्षित असताना शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा अग्रिम मिळावे व अतिवृष्टी मदत मिळावी या मागण्यांना घेऊन परळी तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकरी ‘शिमगा’ आंदोलन करणार आहे. या आंदाेलनात सहभागी होण्याचे आवाहन मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, भगवान बडे, कांबळे आबा, विष्णू देशमुख, रुस्तुम माने, मुक्तेश्वर कडभाने, राजेभाऊ गडदे, बालासाहेब पौळ आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares