वीजतोडणी: माजलगावात महावितरणच्या परिसरात वीज बिलाची होळी ; संभाजी ब्रिगेडकडून आंदोलनाचा इशारा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांच्या शेतामधील थ्री फेज वीज तोडणी केली जात असल्याच्या निषेधार्थ बुधवार १६ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजी ब्रिगेड वतीने माजलगाव येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बीलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील थ्री फेज वीजेची तोडणी केली जात आहे. ही तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी, ज्या गावची वीज तोडल्या गेली आहे ती तात्काळ जोडून देण्यात यावी. अतीवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पीकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. माजलगाव तालुक्यातील कारखाने दोन दिवसात सुरू झालेले आहेत.
सध्या रब्बी पिकांची शेतकरी पेरणी करत असुन याच दरम्यान शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. शेतकरी दोन महिन्यात टप्प्या टप्याने वीज बील भरतील परंतु त्यांची वीज तोडणे त्यांच्यावर अन्यायकारक असून महाविरतणच्या या निर्णयाच्या विरोधात बुधवारी माजलगाव येथील महावितरण कार्यालयाच्या समोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने वीज बिलाची होळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय दराडे, जिल्हा संघटक कृष्णा तौर, शहर अध्यक्ष परमेश्वर अडागले, उपाध्यक्ष अण्णासाहेब सोलंके, तालुका सचिव सुग्रीव करे, विलास कोळपे, रविराज पवार, तुकाराम नावाडकर आदी सहभागी झाले होते .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares