आंदोलन: एफआरपीचा फरक देण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
उसाचा दर जाहीर करण्यासह मागील वर्षीचा एफआरपीचा फरक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून आंदोलन करण्यात आले. तुळजापूर जुन्या बसस्थानकासमोर आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
आंदोलनाचा एक भाग म्हणून उसाची वाहतूक करणारी वाहने रोखली. संबंधित साखर कारखान्याच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यावर आंदोलन मागे घेतले. यावेळी जिल्हाध्यक्ष इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, राजाभाऊ हाके, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, विकास मारडे, प्रदीप जगदाळे, बाळासाहेब शेरेकर, आदित्य काळे, संतोष भोजने, नीलेश गाठे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares