बंदे मैं है दम…! परिचर तरुण होणार PSI, शेतकऱ्याच्या मुलाच्या संघर्षाला यश – News18 लोकमत

Written by

दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक दिली अन्..
Breaking : मुंबई-गोवा महामार्गावरील राणेंच्या फार्म हाऊसजवळील ऑडीत डेड बॉडी
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणात मोठी अपडेट
499 रुपयांत स्कूटर… तुम्हाला आलाय का असा मेसेज किंवा कॉल? काय आहे सत्य
यवतमाळ, 19 नोव्हेंबर : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटं, समस्या असतातच. काही जण त्यांना समस्यांना हारतात तर काही जण त्या समस्यांना सामोरे जाऊन लढतात आणि आपलं अस्तित्त्व सिद्ध करतात. अशीच एका तरुणाने जो पंचायत समितीमध्ये एक साधा परिचर म्हणून कार्यरत होता, त्याने अत्यंत मेहनत आणि सातत्याच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआयच्या पदाला गवसणी घातली आहे.
बंडूच्या संघर्षाची कहाणी –
बंडू जनार्दन भालेकर असे या 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या आयुष्यातील संकटांना न डगमगता हे यश संपादन केले आहे आणि एक साधा परिचर आता आपल्या गुणवत्तेच्या बळावर थेट साहेब म्हणून वावरणार आहे.
बंडू हा मूळ अमरावती जिल्ह्यातील जळका शहापूर गावातील रहिवासी आहे. तो शेतकरी कुटुंबातून येतो. 2010 मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर बहिणींनी त्याला आईची माया दिली. घरची परिस्थिती साधारण असल्याने त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच नोकरीसाठी प्रयत्न केले. यानंतर 2013मध्ये त्याला यवतमाळ जिल्हा परिषदेत परिचर म्हणून नोकरी मिळाली.
यानंतर त्याने नेर पंचायत समितीअंतर्गत शिरसगावच्या पीएचसीमध्ये 2018 पर्यंत काम केले. मात्र, हेच काम करत असतानाही त्याने आपल्याला याच पदावर न राहता काहीतरी विशेष करायचं, त्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायची हा ध्यास घेतला. यातूनच त्याने आपल्या उरात पीएसआय होण्याचे स्वप्न पाहिले. दरम्यान, 2018 नंतर त्याने नेर पंचायत समिती कार्यालयातच बदली मिळविली. याठिकाणी त्याला एक महिना रात्रपाळी तर एक महिना दिवसाची ड्युटी असे त्याच्या कामाचे स्वरुप होते.
हेही वाचा – Gaming Industry : 2023 मध्ये 'या' सेक्टरमध्ये लाखोंना नोकरीच्या संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती
यावेळी रात्रपाळीत तो पंचायत समितीमध्ये बसून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. तर दिवसपाळीत नेर नगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. अभ्यास करताना त्याने एक-दोनदा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परिक्षा दिली. मात्र, अवघ्या काही गुणांनी त्याला अपयश आले. मात्र, तरीसुद्धा न हारता, न खचता त्याने पुन्हा सप्टेंबर 2022 मध्ये परीक्षा दिली आणि त्यात त्याने यश मिळवले. यात त्याला 400 पैकी 264 गुण मिळवले.
मुख्य परीक्षा पास झाल्यावर लवकरच त्याला फिजिकल टेस्ट आणि मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, कटऑफ हा 237 गुणांचा आहे. त्यामुळे त्याला यापेक्षा बरेच जास्त गुण आहेत. त्यामुळे त्याची पीएसआय म्हणून आपली निवड होणे, ही केवळ औपचारिकता असल्याचे मत बंडूने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
पीएसआय होण्याच्या स्वप्नाने झपाटलेल्या बंडूचे 2021 मध्ये लग्न झाले. तेव्हा पॉलिटेक्निक करीत असलेल्या पत्नी प्रतीक्षाने त्याला अभ्यासासाठी भरपूर साथ दिली. दरम्यान, बंडू हा सध्या फिजिकल टेस्टसाठी तो नेरमधील नेहरू महाविद्यालयाच्या परिसरात दररोज सराव करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police sub inspector, Success story, Yawatmal

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares