मुदाळतिट्टा येथे विरोधकांचे रस्ता रोको आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
01538
मुदाळतिट्टा : येथे विरोधी आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
….
‘बिद्री’ने एफआरपीपेक्षा
५०० रुपये जादा द्यावेत

मुदाळतिट्टा येथे विरोधकांचे रास्ता रोको आंदोलन
बिद्री, ता.१८ : बिद्री साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा ५०० रुपये जादा दरवाढ द्यावी, या मागणीसाठी विरोधी आघाडीच्या वतीने मुदाळतिट्टा (ता. कागल) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे निपाणी-राधानगरी, गारगोटी-कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
यावेळी बोलताना मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, ‘ऊस उत्पादक सभासद व मेहनती कामगारांमुळे कारखान्याची रिकव्हरी चांगली बसते. उसाला पाचशे रुपये दरवाढ द्या; अन्यथा भविष्यातील संघर्षाला तयार राहा.’ जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, ‘ऊस उत्पादकांना जादा ५०० रुपये दर मिळावा, यासाठी संचालक मंडळाकडे यापूर्वी वारंवार लेखी मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने आज रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.’ अशोकराव फराकटे म्हणाले, ‘बिद्री कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे असे सत्ताधारी मंडळी सांगतात. मग शेअर्स रकमेत वाढ करण्याची गरज काय?’
याप्रसंगी बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, विजय बलुगडे, अरुण जाधव, बाबा नांदेकर यांची भाषणे झाली. आंदोलनात ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, बालाजी फराकटे, नंदकिशोर सूर्यवंशी, कल्याणराव निकम, नंदकुमार पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, कल्याणराव निकम, यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares