शिवसेना: शेतकरी संवाद पायी दिंडी पहिल्या टप्प्याची सांगता, जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेण्यासाठी शेतकरी पायी संवाद दिंडीचेआयोजन केले होते. सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी नेर येथून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीवटेश्वरांचे दर्शन घेऊन सुरू केलेल्या या दिंडीच्या पहिल्या टप्प्याची सांगता १७ नोव्हेंबर रोजी वंजार उम्रद येथे करण्यात आली.
नेर, टाकरवन, मानेगाव जहाँगीर, मानेगाव खालसा, मानेगाव तांडा-१, मानेगाव तांडा-२, बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, सिंधीकाळेगाव, पिरकल्याण व धारकल्याण येथील संदानंद महाराज यांच्या मठावर गवळी पोखरी, अंभोरे वाडी, नंदापुर, देवमुर्ती, धारकल्याण, नाव्हा, कडवंची आदी गावांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधून गोंदेगाव वंजार उम्रद येथे सांगता करण्यात आली. या संपुर्ण दिंडीत शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी शिवाजी शेजुळ, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, देवनाथ जाधव, गणेशराव देशमुख, एकनाथ पडूळ, रामा गायकवाड, किसन राठोड, विठ्ठल खरात, विभागप्रमुख सखाराम गिराम, बाबुराव कायंदे आदी सहभागी झाले.
तर आयोजन तालुकाप्रमुख हरिभाऊ पोहेकर, अशोक खलसे, राजु जाधव, दिलीप मोहिते, विठ्ठल पडूळ, गणेश पवार, दिलीप राठोड, परमेश्वर डोंगरे, तुकाराम डोंगरे, नारायण डोंगरे, उध्दव सवडे, बाबासाहेब डोंगरे, गणेश पडुळ, दिलीप डोंगरे, शरद डोंगरे, विष्णुपंत गिराम, अमीर शेख, सुभाष गिराम, जनार्धन गिराम, भागवत गिराम, सुरेश वाघमारे, सुधीर शिंदे, उध्दव भुतेकर, भागवत भुतेकर, मुरली अंभोरे, सखाराम वाघमारे, रामेश्वर तिडके, प्रदीप वाघ, दत्तु तिडके, रंगनाथ मगर, कृष्णा तिडके, बाबासाहेब वाघ, रमेश वाघ, विकास जायभाये, बबनराव खरात, प्रभाकर घडलिंग, संतोष खरात, सर्जेराव शेवाळे आदींनी आयोजन केले होते. या दौऱ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, रावसाहेब राऊत, बाबुराव पवार,शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, भरत सांबरे,अंकुश पाचफुले, विजय पवार, दिपक रननवरे, तुळशीदास काळे, संदीप मगर, अश्विन अंबेकर, तुकाराम भुतेकर, विकास गोर्डै, गंगुबाई वानखेडे, मंगल मिटकरी, हरी शेळके, मंजुषा घायाळ, अंजली बनसोडे, संगीता सानप, कांचन शिरभे, शेषराव लहाने, माऊली गोरे, नागोराव थेटे, भगवानराव वाघमारे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares