सावरकरांवरून हुलकावणी: शेगावातील विराट सभेत राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणे टाळले; शेतकरी, बेरोजगारीचा मुद्… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
भारत जोडाे यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी शेगावात सभा घेतली. नांदेड येथील सभेपेक्षा जास्त गर्दी जमवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने नाराजी व्यक्त करत आघाडीत फुटीची भाषा केली. राष्ट्रवादीने राहुल गांधींनी असे बोलायला नको होते, असा पवित्रा घेतला. दरम्यान, दिवसभर भाजप आणि मनसेने राहुल यांच्याविरुद्ध आंदोलन केले. शेगावात राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा टाळत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यावरून केंद्र, राज्य सरकारवर टीका केली.राहुल गांधी म्हणाले, मागील आठ वर्षांत देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहे. पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कुणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात आणि त्यांना एखादी खासगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरुण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मूठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही.
राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पण त्यांना भाजप सरकार मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही. पीक विमाही मिळत नाही. शेतकरी ५० हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो, कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होतो तेव्हा तो जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत कळताच युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतकऱ्याची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.
कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भीती पसरवण्याचे काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव अहिंसा याने लोक एकजूट होतात. विरोधक विचारतात की देशात कुठे आहे हिंसा, भीती, द्वेष ? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकला तर मग कळेल की द्वेष, हिंसा, भहती कुठे आहे ?
द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधू, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले. आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जिजाऊ यांनी मार्ग दाखवला. त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले.
राहुल यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन आठ वर्षांत देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहे. त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कुणी ऐकत नाही.
कारगिल युद्धात दोन्ही पाय व उजवा हात गमावलेल्या नायक दीपचंद यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. सभेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मराठीत भाषण केले.
गजानन महाराजांच्या दर्शनानंतर राहुल गांधी यांनी सहकाऱ्यांसोबत प्रसादालयात भोजन केले.
राहुल यांना बॉम्बने उडवण्याची धमकी इंदूरच्या दुकानावर पत्र पाठवून राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिसांत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला.
सावरकरांवरून आघाडीत बेबनाव संजय राऊत : राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यास या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडू शकते.
छगन भुजबळ : सावरकर यांनी देशासाठी शिक्षा भोगली ती आपल्याला मान्य करायला हवी. राहुल गांधी यांना वक्तव्य टाळता आले असते तर बरे झाले असते, एवढेच मला म्हणायचे आहे.
जयराम रमेश : शिवसेना आणि काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही पुढेही एकत्रच राहणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares