Bharat Jodo Yatra Live Updates Rahul Gandhi public meeting in Shegaon Buldana today, MNS will show black flags | Bharat Jodo Yatra Live Updates : भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील पाचवा दिवस; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिक – ABP Majha

Written by

By : abp majha web team | Updated: 19 Nov 2022 12:18 PM (IST)
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा पाचला दिवस आहे. काल यात्रेनं अकोल्यातून शेगावमार्गे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केलाय. आज सकाळी ही यात्रा शेगावातून बुलडाणा जिल्ह्यातील जलंब शहरात आलीय.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातला पाचवा दिवस आहे. आज स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती ही आहे त्यानिमित्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. 
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने उद्या देशव्यापी बँक संप मागे, उद्याला देशभरातील बॅंका सुरु राहणार
कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाचा होणार  
मुख्य कामगार आयुक्तां(केंद्र) सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीत निर्णय 
आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही
सोबतच बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनं करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा होता बॅंकिंग संघटनांचा आरोप 
काही बॅंकांचे कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांचा पुढाकार
देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, युवकांना रोजगार मिळत नाही. पण उद्योगपतींचे हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातंय असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान शेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. 
Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता बुलढाण्यात पोहोचली आहे. शेगावच्या गजानन मंदिरात राहुल गांधी दाखल झाले आहेत. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आलं. 
 
#BigBreaking सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे, महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही; संजय राऊतांशी चर्चा केल्यानंतर जयराम रमेश यांचा दावा #SanjayRaut #RahulGandhi https://t.co/S4wfakbl7I pic.twitter.com/xkriTDP8fC
Jairam Ramesh on Sanjay Raut : संजय राऊतांनी सकाळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी सकाळीच संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचे आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे असं बोलणं त्यांच्यात आणि माझ्यात झालं. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असं संजय राऊत म्हणाले.”
Bharat Jodo Yatra :  अकोल्यात शेगावाकडे जाणाऱ्या मनसेच्या 100 वर कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. मनसे जिल्हाप्रमुख राजेश काळेंसह कार्यकर्त्यांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मनसेच्या डाबकी रोडवरील जिल्हा कार्यालयातून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अकोल्यातील अनेक मनसे कार्यकर्ते भूमिगत झाल्याने पोलिसांची शोधाशोध सुरू आहे.
Bharat Jodo Yatra : चिखलीत पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रोखल्या आहेत. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 
Bharat Jodo Yatra :   राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माजलगावमध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी गाढवाच्या गळ्यामध्ये राहुल गांधी यांचा फोटो बांधून जोडे मारो आंदोलन केलं. माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 
Bharat Jodo Yatra :   पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या माफीवीरचे फ्लेक्सची पोलिसांनी दखल घेतली आहे. सारसबागेजवळ असलेल्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून लावण्यात आले होते फ्लेक्स. पुण्यातील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर तसेच राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावण्यात आले होते. महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसकडून हे फ्लेक्स लावल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून युवक प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना विरोधात विविध कलम अन्वये स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फ्लेक्स लावल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट घेतली आहे. 
Bharat Jodo Yatra :   काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या आजच्या शेगावच्या सभेला येण्याची शक्यता मावळली आहे. आज बुलढाण्यात राहुल गांधी यांची सभा होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया गांधी या सभेला येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतरही सोनिया गांधी येण्याची शक्यता मावळली आहे.

Bharat Jodo Yatra :  शेगाव येथे आज खासदार राहुल गांधी यांची सभा होणार आहे. सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळं मनसे कार्यकर्ते शेगावत दाखल झाले असून, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार आहेत.
Bharat Jodo Yatra :  भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंंदूरमधील एका मिठाई दुकानात निनावी पत्र आलं आहे.  
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेनिमित्तानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जळगाव जिल्ह्यातून पाच ते सहा हजार कार्यकर्ते विविध वाहनांनी शेगावकडे रवाना झाले आहेत. यावेळी काँगेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देण्यात आल्या. 
Bharat Jodo Yatra :  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं बुलढाणा जिल्ह्यात आगमन झालं आहे. या यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं. राहुल गांधी यांनी यावेळी विठ्ठलाची पुजा केली. तसेच रिंगण सोहळ्यात राहुल गांधी यांनी सहभाग घेतला.

Prakash Mahajan on Rahul Gandhi : “राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांचे इटलीचे आजोबा हे मुसोलिनीचे हस्तक होते. मोतीलाल नेहरु हे इंग्रजांचे वकील होते. स्वतः पंडित नेहरु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आणि त्यानंतर माफी मागितली. यावर राहुल गांधी का बोलत नाहीत,” असा सवाल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि सवंग प्रसिद्ध मिळवू नये, असं मनसेने म्हटलं आहे.
Savarkar Banner in Pune : पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाबाहेर महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसने सावरकर यांचे लावलेले बॅनर सावरकरप्रेमींनी काढून टाकले आहेत. या बॅनरवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला आहे. तसंच सावरकर आणि ब्रिटीश सरकार यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचे फोटे फ्लेक्सच्या स्वरुपात लावण्यात आले होते. यावरुन वाद सुरु झाला होता. त्यानंतर सावरकरप्रेमींनी हे फ्लेक्स काढले आहेत.
Bharat Jodo Yatra :  राहुल गांधी यांनी नेपाळचे राष्ट्रगीत वाजवून भारताच्या राष्ट्रगीताचा जाहीर अपमान केला असल्याचा आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. राष्ट्रगीत हा भारतीय राष्ट्रभक्तीचा संस्कार असून आता पर्यंतच्या इतिहासात आपल्या भुमीवर कधीच दुसऱ्या देशाचे राष्ट्रगीत ऐकण्यात आले नाही. पण राहुल गांधीच्या नेतृत्वात असे संस्कार नाहीत. सावरकरांच्या विरोधात गरळ ओकणारे राहुल गांधी उद्या आपले आजोळ असलेल्या इटली देशाचे सुद्धा राष्ट्रगीत वाजवू शकतात असा टोलाही त्यांनी मारला.
Bharat Jodo Yatra : बुलढाणा जिल्ह्यात थोड्याच वेळात राहुल गांधी यांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी शेगाव तालुक्यातील वरखेड या गावी झालेली आहे. जवळपास एक हजार वारकऱ्यांसोबत  रिंगण सोहळ्यात राहुल गांधी सामील होणार आहेत.

Bharat Jodo Yatra :  भारत जोडो यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. 
Bharat Jodo Yatra : मनसे कोण? असा उपरोधी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले असल्याचे पटोले म्हणाले.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Live Updates : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा पाचला दिवस आहे. काल यात्रेनं अकोल्यातून शेगावमार्गे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केलाय. आज सकाळी ही यात्रा शेगावातून बुलडाणा जिल्ह्यातील जलंब शहरात आलीय. भारत जोडो यात्रा आज सकाळी शेगाव वरून सकाळी 6 वाजता निघाली. सकाळी 10 वाजता राहुल गांधी हे शेगाव वरून जलंब या गावी पोहचली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घरासमोर सुंदर रांगोळी काढली तर काही महिलांनी फुलांची रांगोळी काढली. ग्रामीण भागात भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे.  भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
‘मी सिन्सियर मिनिस्टर! मंत्री बोलत असताना डिसिप्लिन पाळावा’; मंचावरील IPS अधिकाऱ्याला दीपक केसरकरांनी सुनावलं
मध्य रेल्वेवर 27 तासांचा जम्बोब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेसलाही फटका, जाणून घ्या कोणत्या ट्रेन बंद 
Bharat Jodo Yatra ; राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके, बुलढाण्यात सभा बंद पाडण्याचा प्रयत्न
Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याचा पाकिस्तानात मृत्यू, भारतात दहशतवाद पसरवण्याचं करत होता काम
Parbhani : शेतकऱ्यांची थट्टा! कुणाला पावणेदोन रुपये तर कुणाला 70 रुपयांची मदत; शेतकरी आक्रमक 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares