New marathi serial : झी मराठीवर भेटीला येणार नवी मालिका; पहिल्याच प्रोमोने वेधलं लक्ष – News18 लोकमत

Written by

टीआरपीसाठी झी मराठीने बांधला चंग; दोन नव्याकोऱ्या मालिका होणार सुरु
'ती एकटीच बॉलिवूडला…'; 'दृश्यम 2'मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य
'माझ्यावरही श्रद्धासारखीच वेळ';स्वतःशीच लग्न केलेल्या कनिष्काचा धक्कादायक खुलासा
स्ट्रगलच्या काळातील 'ते' दिवस आठवून भर स्टेजवर रडला रणवीर सिंग; व्हिडीओ व्हायरल
मुंबई, 31 ऑगस्ट : टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन प्रयोग करताना दिसतात. झी मराठीवर असाच एक  आहे. झी मराठी वाहिनीवर लागोपाठ नवीन मालिका दाखल होत आहेत. जुन्या मालिकांना काही केल्या टीआरपी मिळत नाहीये. टीआरपीच्या शर्यतीती झी मराठीच्या मालिका खूप मागे आहेत. त्यामुळे जुन्या मालिका संपवून नवीन मालिका सुरु करण्याचा ट्रेंड सध्या झी मराठीवर दिसत आहे. मध्यंतरी तू चाल पुढं, अप्पी आमची कलेक्टर या मालिका सुरु झाल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सुरु होणार आहे. आता पुन्हा एकदा नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका संपणार असल्याची शक्यता आहे.
झी मराठीवर येत्या 19 सप्टेंबर पासून 'दार उघड बये' हि नवीन मालिका  सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. ही  मालिका स्त्री केंद्रित असल्याचं दिसत आहे. 'दार उघड बये' ही  मालिका झी बांग्ला वरील 'जमुना धाकी' या मालिकेचा रिमेक असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – Sneha Wagh : 'इथे येणं माझ्या नशिबात लिहिलं होतं'; असं का म्हणतेय स्नेहा वाघ?
शरद पोंक्षेंसोबत या मालिकेत नवीन चेहरे दिसून येत आहेत. येत्या 19 सप्टेंबर पासून 'दार उघड बये' झी मराठीवर 8:30 वाजता सुरु होणार आहे. झी मराठीवर सध्या या वेळेत माझी तुझी रेशीमगाठ ही  मालिका असते. त्यामुळे आता ही  मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहावरील 'ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे ते या मालिकेतून एक्झिट घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

मागच्या काही दिवसांपासून माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सतत तेच तेच घडत असल्याने मालिका सतत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यामुळे मालिका खरचं निरोप घेणार का असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता हि नवीन सुरु होणारी मालिका प्रेक्षकांना आकर्षित करून झी मराठीचा टीआरपी वाढेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares