Parbhani : शेतकऱ्यांची थट्टा! कुणाला पावणेदोन रुपये तर कुणाला 70 रुपयांची मदत शेतकरी – ABP Majha

Written by

By: पंकज क्षीरसागर, एबीपी माझा | Updated at : 19 Nov 2022 05:26 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
parbhani farmer crop insurance
Parbhani Farmer News:  परभणी जिल्ह्यात (Parbhani Update) यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना पीक विमा रक्कम वाटप सुरुवात झाली आहे. मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येते. कुणाला 1 रुपया 70 पैसे, कुणाला 74 रुपये, कुणाला दोनशे रुपये अशाप्रकारे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याची एवढी रक्कम घेऊन करायचं का? असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. 
परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल 6 लाख 71 हजार 573 शेतकऱ्यांनी 48 कोटी 25 लाखांचा विमा भरला होता. ज्यातून 4 लाख 38 हजार 812 हेक्टर एवढे पीक क्षेत्र संरक्षित केले होते. यात अतिवृष्टी झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर आधी पिकांचे नुकसान झालं. यासंदर्भात शासनाची मदत असेल किंवा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले मात्र त्याचा उपयोग झाला. 
काल आणि आज आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खातात पीक विमा रक्कम जमा केली जातेय. जी शेतकऱ्यांची थट्टा करणारी असून शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया 71 पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 221 रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 रुपये असे अत्यंत कमी रक्कम या कंपनीकडून जमा केली जात आहे. ज्यामुळे शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत ही रक्कम घेऊन नेमकं करायचं काय? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. किमान जी रक्कम पिक विम्यासाठी भरली तेवढी तरी रक्कम देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
कृषिमंत्र्यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा

Reels
ही बातमी देखील वाचा
Maharashtra Cabinet : नोकरभरतीसाठी आता ‘या’ कंपन्या, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; कॅबिनेटचे 15 महत्वाचे निर्णय
Megablock: 27 तासांचा महाब्लॉक! लोकलसह या एक्स्प्रेसही रद्द, आज ही बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ajit Pawar: …तोपर्यंत महाविकास आघाडीत फूट पडू शकत नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra News Updates : मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या 184 वर 
मध्य रेल्वेवर 27 तासांचा जम्बोब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेसलाही फटका, जाणून घ्या कोणत्या ट्रेन बंद 
Pune Crime : पुण्यात पोलिसही असुरक्षित! डोक्यात घातला दगड; पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ
‘मी सिन्सियर मिनिस्टर! मंत्री बोलत असताना डिसिप्लिन पाळावा’; मंचावरील IPS अधिकाऱ्याला दीपक केसरकरांनी सुनावलं
Bharat Jodo Yatra ; राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके, बुलढाण्यात सभा बंद पाडण्याचा प्रयत्न
Tata Tiago NRG CNG व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याचा पाकिस्तानात मृत्यू, भारतात दहशतवाद पसरवण्याचं करत होता काम
Latur : लातुरात बनावट NA लेआउट देणारी टोळी सक्रिय; माहिती अधिकारातून धक्कादायक प्रकार उघड

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares