Buldhana : स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस, तुपकर आंदोलनावर – ABP Majha

Written by

By: डॉ. संजय महाजन | Updated at : 21 Nov 2022 06:43 AM (IST)
Edited By: ज्योती देवरे
buldhana police notice to swabhimani shetakari sanghatana leader ravikant tupkar
Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते रविकांत तुपकर  (Ravikant Tupkar) यांना बुलढाणा पोलिसांच्या (Buldhana Police) वतीने नोटीस देण्यात आली आहे. अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा या नोटीशीद्वारे तुपकर यांना दिला आहे. मध्यरात्री 12 वाजता बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावली. तर कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, काहीही झाले तरी जलसमाधी आंदोलन होणारचं असं सांगत रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम असल्याचं दिसत आहे. 
सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे 
रविकांत तुपकर यांना दिलेल्या नोटिशीमुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. परंतु अशा नोटिशींना मी घाबरत नाही. काही झालं तरी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्यामुळे  सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सोयाबीन-कापूस प्रश्नी आक्रमक भूमिका
सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावे, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू,असा इशारा दिला होता.

Reels
प्रशासनाची चांगलीच तारांबळ
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. पोलिसांनी रविकांत तुपकरांना दिलेल्या नोटिशीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठांम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
तर 24 नोव्हेंबरला बघूनच घ्या…! 
सरकार शेतकऱ्यांना जगूही देत नाही, मरुही देत नाही, अशा नोटीशीला आम्ही घाबरत नाही, अशा नोटीसांनी माझ्या घरातील कपाट भरले आहेत. जर सरकारला आमची प्रेतचं पाहिजे असतील तर 24 नोव्हेंबरला बघूनच घ्या…! असेही तुपकर म्हणाले. मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणारचं, हिम्मत असेल तर अडवूनच दाखवा,असे आवाहनच रविकांत तुपकरांनी सरकारला दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
 
 
 
 
 
 
Buldhana News : अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल, शिवरायांविरोधातील वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाड यांचा इशारा
Bharat Jodo: महाराष्ट्रात यात्रेच्या शेवटच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi: आदिवासी हेच देशाचे मालक, भाजपकडून त्यांची ओळख पुसण्याचे काम सुरू; राहुल गांधी यांचे टीकास्त्र
काँग्रेस नेत्यांची बदनामी थांबवा, आम्ही BJP-संघाचे सत्य सांगणे बंद करु; जयराम रमेश यांचा टोला
Bharat Jodo Yatra ; राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके, बुलढाण्यात सभा बंद पाडण्याचा प्रयत्न
Measles Disease : लसीकरण करा अन्यथा गोवर गंभीर होऊ शकतो! कोणत्या वयोगटात अधिक लागण? काय सांगताहेत तज्ञ
Jalgaon News : नियोजनाच्या निधी खर्चावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी
Dhule: सध्या राजकारण्यांकडून काही अपेक्षा करावी अशी परिस्थिती राहिली नाही; लेखिका अरुणा ढेरे यांची खंत
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया; 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक गंभीर जखमी
Kolhapur Police : भुरट्या गुंडांची वाढती मर्दुमकी ते भर चौकात हुक्का ओढत माजगिरी; कोल्हापूर पोलिसांचा वचक संपला की काय?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares