Maharashtra News Updates : कात्रज बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम, कात्रज बोगद्याजवळून पुण्याकडे जाणारी छोट्या गाड् – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 20 Nov 2022 11:04 PM (IST)
पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात, 15 ते 16 गाड्या उडवल्याची पोलिसांना खबर, घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल, कंटेनरने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर धडकले असे प्राथमिक अंदाज
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने दोघांमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे आता कोणासोबतही युती करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेवढे लिहून देतात तेवढेच उद्धव ठाकरे बोलतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांचे विचार आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जेवढे स्क्रिप लिहून देतात तीच स्क्रिप्ट आता सामनामधून छापून येते. चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता कोणत्या विचारांसोबत आपण युती करतो आहे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना कळत नाही, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
रायगड : जुना मुंबई – पुणे मार्गावरील खंडाळा घाटात अपघात … 
ब्रेक फेल झाल्यामुळे खाजगी बसचा अपघात …
बस पलटी झाल्याने प्रवासी जखमी , 7 प्रवासी किरकोळ जखमी …
एकविरा येथून मुंबईच्या दिशेने  निघालेली बस पलटी… 
चेंबूर येथील शाळेतील कर्मचारी यांच्या बसला अपघात  ..
जखमी प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात उपचार सुरू…
Jalana News: राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्याचा जालना येथे देखील करण्यात आला, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येते राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला, यावेळी आंदोलकांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला, दरम्यान  राज्यपालांची महाराष्ट्रातुन हकालपट्टी करावी अशी मागणी करत तासभर आंदोलकांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 
Ratnagiri News: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. सुरक्षा रक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते व धरणाचे दरवाजे अर्धवट उघडण्यात आले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे.या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये याची लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
अथणी तालुक्यातील हुलगबाळी येथून उगार साखर कारखान्याला ट्रॅक्टरमधून ऊसाची वाहतूक करण्यात येत होती. ट्रॅक्टर कार्ताळ गावाजवळ आलेला असताना ट्रेलरमधील उसाला रविवारी सकाळी आग लागली आणि क्षणार्धात धुराचे लोट निघू लागले. ट्रेलरमधील उसाला आग लागल्याचे ट्रॅक्टर चालकाला समजताच त्याने प्रसंगावधान दाखवून ट्रेलर ट्रॅक्टरपासून अलग केला. पेटलेला ट्रेलर रस्त्याशेजारी जाऊन उलटला. नंतर अग्निशामक दलाने ट्रेलरमधील ऊसाला लागलेली आग विझविली. या घटनेची कागवाड पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.
मुबंईतील कर्नाक रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 27 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, आजही मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुंबई ही कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. रेल्वेने जाणारे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे वळल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांचा चांगलाच गल्ला जमवला आहे. 
Sanjay Raut: भाजप प्रवक्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान, भाजप-शिंदे गट जोडे मारा आंदोलन करणार का? संजय राऊत यांचा सवाल
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.. मात्र यावेळी सभास्थळी कुणीतरी फटाके लावले.. एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते तर दुसरीकडे आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती.. या सगळ्या प्रकारावर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचंड संतापले… जाणूनबुजून श्रद्धांजली सभेत कुणीतरी फटाके लावल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.
Mhada : मुंबईतील म्हाडाच्या 30 वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाकडून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून आता शिंदे-फडणवीस सरकार पुनर्विकासाचा हा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. मुंबईत म्हाडाच्या अशा जवळपास  388 इमारती आहेत आणि त्यात सुमारे 30 ते 40 हजार कुटुंब राहतात. पुनर्विकासाच्या निर्णयामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Gulabrao Patil : शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याच्या तारखेत बदल झालाय.. मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदार उद्या गुवाहाटीला जाणार होते. या ठिकाणी हे सर्व जण कामाख्या देवीचं दर्शन घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या दौऱ्याच्या तारखेत बदल झालाय. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलीय.
Jalna News : जालना शहरातील सिद्धिविनायकनगर भागात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहे. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे, रात्री 10 च्या सुमारास या भागात राहणाऱ्या  ताराबाई जाधव यांच्या भाडेकरूकडे गॅस सिलेंडर लिक होऊन अचानक स्फोट झाला.  स्फोटात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय
Mumbai Local Mega Block: 154 वर्ष जुना कर्नाक पुल पाडण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी मध्य रेल्वेनं 27 तासांचा जंम्बोब्लॉक घोषित केलाय. यादरम्यान मध्य रेल्वे सीएसएमटी ते भायखळा तर हार्बर रेल्वे सीएसएमटी ते वडाळा या स्थानकांदरम्यान पूर्णपणे बंद आहे. या दरम्यान  जवळपास 1800 पैकी 1100 गाड्या रद्द करण्यात आल्यात.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…
मध्य रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 27 तासांच्या जम्बोब्लॉकला सुरुवात झाली आहे.  कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीएसएमटीकडे येणाऱ्या काही एक्स्प्रेस ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकपर्यंतच धावणार आहेत. त्याशिवाय काही ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकमधून मार्गस्थ होतील. मध्य रेल्वेच्या या 27 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका जवळपास 27 लाख लोकांना बसणार आहे.
काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत 14 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा मुक्काम या यात्रेनं भेंडवळ या गावी केला. त्याआधी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.  
53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) चर्चा आहे. आजपासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 
फिफा विश्वचषक आजपासून कतारच्या दोहा येथील अल बायत स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला गेलाय. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे. फिफाचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सहभागी होणार आहेत.
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया; 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक गंभीर जखमी
Pune Navale Bridge Accident : ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता; नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं!
Aaditya Thackeray Letter : विकासकामे झाल्यानेच विरोधकांना वरळीचा हेवा, आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना पत्र
Mumbai Prabhadevi Rada : ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने, प्रभादेवीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा
Fifa World Cup 2022 : आज बलाढ्य इंग्लंडसमोर इराणचं आव्हान, पहिल्यांदाच दोघेही एकमेंकाविरुद्ध मैदानात

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares