Maharashtra News Updates 21 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर… – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 21 Nov 2022 04:06 PM (IST)
ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहेत अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत, अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे विज जोडणी कापल्याच्या तक्रारी होत्या, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत
बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी व्हावी या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या महिलांच्या जवळील पेट्रोलच्या बॉटल जप्त करत महिलांना ताब्यात घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील सुरू असलेली गुटखाबंदी बंद करण्याची या महिलांनी मागणी केली आहे.
Sindhudurg News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज सिंधुदुर्गात होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस धाडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कणकवलीतील सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस कणकवली पोलिसांनी बजावल्या आहेत.

पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलनं राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं.  राज्यपाल आणि शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात पुण्यात अलका टॉकीज चौकात शिवसेनेने आंदोलनं केलं. दोघांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून राज्यपाल आणि सुधांशू यांच्या फोटोला जोडे मारले गेले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात पुण्यात हटके आंदोलन केले आहे.  प्रतीकात्मक धोतर नेसवून  डमी राज्यपाल तयार केले होते. सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात, अशी टीका त्यांनी केली.
Wardha Crime : हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला पेट्रोल टाकून जीवे माराण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्यासाठी तिचा पाठलाग करुन तिच्याशी मैत्री करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पिडीता ही आरोपीशी  बोलत नसल्याने पिडीतेला शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.  पुढील तपास अल्लिपूर पोलीस करीत आहेत.
Palghar News : पालघरमधील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी डहाणू, पालघर भागातून शेकडो आंदोलक रेल्वेने मुंबईकडे रवाना होत आहेत. रायगड, वसई, डहाणूपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टी भागातून जवळपास पंचवीस हजार कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.


Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते रविकांत तुपकर  (Ravikant Tupkar) यांना बुलढाणा पोलिसांच्या (Buldhana Police) वतीने नोटीस देण्यात आली आहे. अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा या नोटीशीद्वारे तुपकर यांना दिला आहे. मध्यरात्री 12 वाजता बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावली. तर कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, काहीही झाले तरी जलसमाधी आंदोलन होणारचं असं सांगत रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम असल्याचं दिसत आहे. 
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Bharat Jodo Yatra : आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.
14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 
काल 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहोचली. निमखेडी फाटा येथे युनिटी ऑफ लाईट हा एक छोटेखानी कार्यक्रमपार पडला. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर पदयात्रा मध्यप्रदेशात जाणार गेली. 
Rahul Gandhi In Maharashtra Aurangabad: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  ‘राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे’, असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव ते कोलाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करतांना प्रवाशांना रस्त्यावरील पडलेले खड्डे चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 
Jitendra Awhad : सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांची ‘ती’ पाच पत्रे दाखवावी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) , यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi)  यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. यावर माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे, 
सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?
एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय. ते म्हणाले, ‘औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली’, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
मोठे षडयंत्र, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेले काही वर्षे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशिष्ट पद्धतीने वेगळे दाखवले आहे. या घटनेला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासात अनेक माणसाने शूर कार्य केले आहे, त्यांना योग्य पद्धतीने दाखवा.”
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान, तरीही राहुल गांधी महाराष्ट्रातच; आज औरंगाबादमध्ये
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  ‘राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे’, असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 
असा असणार राहुल गांधींचा दौरा…
आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.
14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 
Measles Disease : लसीकरण करा अन्यथा गोवर गंभीर होऊ शकतो! कोणत्या वयोगटात अधिक लागण? काय सांगताहेत तज्ञ
Jalgaon News : नियोजनाच्या निधी खर्चावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी
Rasana Founder: ‘रसना’ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन
Akola Politics : राज्यात पुन्हा शिवशक्ती-भिमशक्तीच्या प्रयोगाचा पार्ट-टू साकारला जाणार का?
Dhule: सध्या राजकारण्यांकडून काही अपेक्षा करावी अशी परिस्थिती राहिली नाही; लेखिका अरुणा ढेरे यांची खंत

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares