Satara : शेतकऱ्यांवर आली फुकट भाजी वाटण्याची वेळ, Video पाहून डोळ्यात येईल पाणी! – News18 लोकमत

Written by

19 आणि 20 तारीख मुंबईकरांसाठी डोकेदुखी, रस्ते वाहतूक आणि लोकलचा मेगा ब्लॉक
सातारा : पत्नी-मुलगा मोबाईलवर असताना पतीने केला टीव्ही बंद, यानंतर घडलं भयानक
जागेवरुन लोकलमध्येच दोन गटांत तुंबळ हाणामारी, नालासोपाऱ्यातील घटनेचा Video
शिवरायांच्या 3 दैवी तलवारी पार स्पेनपासून महाराष्ट्रातून लंडनपर्यंत कशा पोचल्या?
सातारा, 21 नोव्हेंबर : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. दिवाळीनंतर आता भाजीपाल्याचे दर कमालीचे घटले आहेत. साताऱ्यात  सध्या भाजीपाला पिकांना एक ते तीन रुपये प्रतिकिलो सुद्धा दर मिळत नाही. यातून उत्पादन खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नाही. अशात एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून भाव न मिळाल्यानं मेटाकुटीस आलेला शेतकरी फुटत भाजी वाटत आहे. 
यंदा पाऊस चांगला झाला. नगदी पिक म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडे मोर्चा वळवला. आता बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. परिणामी दर पडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सगळीकडूनच भाज्यांची आवक वाढली आहे. वाटाणा,  फ्लॉवर, गाजर, भोपळ्याचे दर घटले आहेत. कोथिंबीर तर अगदी फुकट देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून विक्रीसाठी वाहतूक खर्च देखील पदरातून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खर्चाचे गणित तर वेगळेच असल्याचे शेतकरी सांगतात.
सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर शेतकऱ्याचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये शेतकरी फुकट कोथिंबीर विकताना दिसत आहे. मात्र, फुकटसुद्धा शेतकऱ्याची कोथिंबीर कोणी घेत नसल्याचे परिस्थिती आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 रुपयांना भल्या मोठ्या 3 पेंढ्या शेतकरी विक्री करत आहे मात्र त्याला देखील ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. दिवाळी सणात कोथिंबिरीचे मार्केट चांगले तेजीत असते. मात्र, त्यानंतर भाव कोसळायला सुरुवात होते. यावेळी तर पाऊस अधिक झाल्याने उत्पन्न वाढले. मात्र, आवक वाढल्याने भाव मिळाला नाही. कोथिंबिरीसह मिरची, कढीपत्ता, आले यांचे दर देखील घटले आहेत. ग्रामीण भागांतून याचे उत्पादन चांगले येऊ लागले असल्यामुळे या मालाला मुंबई शिवाय दुसरी कोणतीही मोठी बाजारपेठ नाही. 
ऊसदरासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन का करावं लागतं? पाहा Video
शेतकरी पाऊस चांगला झाला की पालेभाजीचे उत्पन्न घेतो. उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्थानिक मंडई तसेच आठवडी बाजारपेठेत विक्री करतो. कधी दोन रुपये मिळतात तर कधी केलेला खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांची खूप वाईट परिस्थिती असल्याचे व्यापारी सतीश गलंडे सांगतात. घाऊक बाजारात दर पडले तरीही किरकोळ बाजारात स्वस्ताई येतेच असे नाही. मात्र, सध्या किरकोळ बाजारांमध्येही भाज्यांचे दर कमी झालेले दिसत आहेत. हीच परिस्थिती पुढच्या महिनाभर राहील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 
बाजार भाव पाहता परिस्थिती खराब
जर थंडी अजून वाढली तर भाज्यांची आवक कमी होईल, आवक घटल्याने पुन्हा भाजीपाल्याला चांगले दर येतील, असा अंदाज शेतकरी लावत आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात कोथिंबिरीची आवक मोठया प्रमाणात झाली असून मोठं नुकसान होत आहे. अर्ध्या एकरात मी कोथिंबीर केली असून 22 हजार रुपये खर्च केला आहे. खर्च निघेल पण फायदा होईल का नाही, आताच सांगता येणार नाही, सध्याचा बाजार भाव पाहता परिस्थिती खराब असल्याचे दहिवडी येथील शेतकरी शुभम खांडे यांनी सांगितले. 
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Satara

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares