आंदोलन अंकुश चे दत्त कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘आंदोलन अंकुश’चे ठिय्या आंदोलन
शिरोळ ता. २१ ः येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने गेल्या हंगामातील गाळपास आलेल्या उसाला दुसरा हप्ता द्यावा व यावर्षीचा दर ३१०० रुपये द्यावा, या मागणीकरिता ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
‘आंदोलन अंकुश’तर्फे दत्त साखर कारखान्याच्या व्यवस्थापनास याआधी मागण्यांचे दोन वेळा निवेदन देण्यात आले आहे. त्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला, हे विचारण्याकरिता धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते कारखान्यात जात असताना सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना गेटवरच रोखले. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन सुरू केले.
चुडमुंगे म्हणाले, साखर कारखाना व्यवस्थापनास ऊस उत्पादकांच्या मागण्यांबाबत दोन वेळा निवेदन दिले आहे. कारखाना व्यवस्थापन या मागण्यांबाबत कोणताही निर्णय जाहीर करत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. तसेच माजी खासदार राजू शेट्टी हे कारखानदारांऐवजी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सरकार उसाला दर देणार नाही, तर कारखान्यांना द्यावा लागणार आहे.
तालुकाध्यक्ष दीपक पाटील, अक्षय पाटील, उदय होगले, भूषण गंगावणे, राजाराम काटकर, सुरेश भोसले, पोपट राणे, अनिल सुतार आदी प्रमुख कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares