ई-पीक पाहणी : सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची? – BBC

Written by

फोटो स्रोत, lahu pawar
शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.
यंदा खरीप हंगामातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत करण्यात आली आहे.
ही नोंद करण्यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं अॅप विकसित केलं आहे.
त्यामुळे ई-पीक पाहणी अॅप काय आहे, ते कसं वापरायचं आणि याचे इतर फायदे काय आहेत, ते आता जाणून घेऊया.
ई-पीक पाहणी अॅपवर वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करायचं आहे.
त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे. इथं ई-पीक पाहणीचं व्हर्जन-2 वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.
इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.
पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.
त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे आणि मग नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथं सुरुवातीला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून पुढे जायचं आहे.
मग पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.
मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.
इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा. मग खातेदाराचं नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका.
आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.
पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.
एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.
पुढे अक्षांश रेखांश मिळवा वर क्लिक करायचं आहे. आणि मग शेवटी फोटो काढावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.
फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला क्लिक करून पुढे जायचं आहे.
पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचं आहे.
त्यानंतर पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.
अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.
शेतातल्या पिकांची माहिती पीक पाहणी अपवर नोंदवल्यानंतर या माहितीचं पुढे काय होतं, यावर काय प्रक्रिया होतं? या प्रश्नावर ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे सांगतात, "शेतकऱ्यांनी या अपवर पिकांची नोंद केल्यानंतर ती नोंद 48 तास कुठेही सातबाऱ्यावर पाठवत नाही. 48 तास ती नोंद दुरुस्तीसाठी दिलेले आहेत. मात्र त्यानंतर ही नोंद गाव नमुना बारावर प्रतिबिंबित करतो आणि मग ती गाव नमुना बारावर दिसायला लागते."
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares