चिपळूणात गटारातील सांडपाणी शेतजमिनीत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ratchl224.jpg
64037
चिपळूणः मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी.
चिपळूणात सांडपाणी शेतजमिनीत
ग्रामस्थ, शेतकरी हैराण; बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण, ता. २२ः शहरातील मुरादपुर भागांत काही ठिकाणची गटारे तुंबली आहे. पालिका प्रशासनास वारंवार माहिती देऊनही गटारांची स्वच्छता झालेली नाही. परिणामी गटारातील घाण पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत जाऊन तेथे मोठ्या प्रमाणात साचते आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत गटारांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यापासून मुरादपूर भागात गटाराच्या विकास कामासंदर्भात दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागांत गटारातील सांडपाणी हे प्रामुख्याने रस्तावर येते. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या शेतजमिनीत साचत आहे. या भागातील स्थानिक नागरिकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यावर स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देउनही या त्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यावर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होतेय. या समस्येला चालना मिळण्यासाठी मुख्याधिकारी शिंगटे यांची मुरादपुर भागातील स्थानिक नागरिकांनी भेट घेत निवेदन दिले आणि चर्चा केली. त्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
ग्रामस्थ म्हणाले, गटाराचे पाणी शेतात जात असल्याने शेतीत मोठी दुर्गधी पसरत चालली आहे. शेती कामातही अडथळे निर्माण झाले आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आहे. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी शुभम कदम, निहार कोवळे, सचिन शेट्ये, ओंकार नलावडे, प्रसाद पवार आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares