धरू कास उद्योगाची – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
rat२११३.txt
(टुडे पान ३ साठी, सदर)
१७ नोव्हेंबर टुडे पान चारवर लोगो फोटो
धरू कास उद्योगाची ……………लोगो
rat२१p४.jpg –
प्रसाद जोग
इंट्रो
शेतकरी राजाची सगळी दारोमदार असते शेती व शेतीपूरक उद्योगांमधून मिळणाऱ्या पैशांवर….
कोकणातला शेतकरी म्हणजे फक्त भात पिकावर उदरनिर्वाह करणारा हे चित्र बदलण्यासाठी कोकणातील प्रयोगशील शेतकरी शेतीत नव नवीन प्रयोग करत आहेत. त्यात त्यांना यशही लाभत आहे. सद्य स्थितीत हवामानातील बदल ओळखून, अवकाळी किंवा मुदतपूर्व पाऊस लक्षात घेऊन शेतकऱ्याला आपले वर्षाचे शेतीचे वेळापत्रक तयार करावे लागत आहे . फक्त आणि फक्त भात शेतीवर अंवलंबून राहणे कोकणातील शेतकऱ्याला परवडणारे नाही यातूनच उद्योजकीय मानसिकता असलेले शेतीमित्र शेतीला पूरक व्यवसायाची काय जोड देता येईल, याच विचारात असतात. शेतीपूरक व्यवसायामध्ये सर्वात सहज आणि सोपा असलेल्या मत्स्य व्यवसायाची उपयुक्तता आज पाहूया………….
प्रसाद जोग,चिपळूण

गोडया पाण्यातील मत्स्य संवर्धन
फार पूर्वीपासून कोकण किनारपट्टीवर कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने समुद्रातून, खाजणातून मासेमारी करत आले आहेत. कोकण किनाऱ्याला समृद्ध मत्स्य संपत्ती लाभलेली आहे. पण आपल्याच शेतात मासे पाळून त्यातून शाश्वत अर्थार्जनाचा प्रकल्प उभारणारे शेतकरी तसे कोकणात पाहायला मिळणे विरळच.
फिशरी आणि फार्मिंग हे तसे एकमेकांना पूरक उद्योग म्हणायला हरकत नाही. कॅप्चर फिशरी आणि कल्चर फिशरी असे दोन प्रकार यामध्ये पडू शकतात. समुद्र, नद्या, सरोवरे, तलाव, तळी यांसारख्या अनेक ठिकाणी माशांचे साठे निसर्गताच असतात. त्या साठ्यामधून शक्य त्या साधनानी मासे पकडण्याच्या प्रकारास कॅप्चर फिशरी असे म्हणतात.
माशांच्या फक्त नैसर्गिक साठयावर अवलंबून न राहता आपल्याला पाहिजे, त्या जातीचे मत्स्य बीज शेततळ्यात सोडून त्यातून मत्स्यसाठे निर्माण करणे, माशांच्या वाढीसाठी योजनाबद्ध प्रयत्न करणे व परिपूर्ण वाढ झालेल्या माशांचे जास्तीतजास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करणे, याला कल्चर फिशरी (मत्स्य संवर्धन )असे म्हणतात. मत्स्यपालनासाठी शेतीमधील जागेची निवड करताना योग्य नियोजन करावे लागते. आयताकृति खड्डा करून त्यात प्लास्टिकचे अस्तरीकरण करून घेऊन मग त्यात पाणी सोडावे लागते. त्यानंतर खात्रीशीर मत्स्यबीज सोडावे लागते व नंतर योग्य मात्रेत माशांना फिशफूड द्यावे लागते. शेत तळ्याची राखण करून माशांच्या सुयोग्य वाढीकडे लक्ष द्यावे लागते.
शेतकऱ्यांचा शाश्वत विकास या जैव विविधतेवरच अवलंबून असतो. मत्स्य संवर्धन हा शेतीला सुयोग्य असा पूरक व्यवसाय आहे. मत्स्य शेतीचे माशांच्या विष्ठेचे पाणी शेतांना खतासारखे उपयोगी पडते. कोकणातील गोडया पाण्यातील मत्स्य क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाल्यास खाऱ्या पाण्यातील मासेमारी प्रमाणे गोड्या पाण्यातील माशांनाही तेवढीच मागणी वाढेल. कोकणात कोळंबी, जिताडा, बासा या मत्स्य शेतीतून व खेकडा पालनातून मोठी अर्थव्यवस्था निर्माण केली जाऊ शकते.
चिपळूण तालुक्यातील खडपोली तळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व आत्माचे सदस्य रणजित रघुनाथ जाधव व त्यांचे पुतणे मनिष अविनाश जाधव यांनी मत्स्य संवर्धनातील समृद्धी ओळखून रुद्र ऍग्रो फार्म अंतर्गत शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणून मत्स्य शेतीचा हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी निर्यातक्षम गुणवत्तेचे कमी काटे असणारे मासे शेततळ्यातील गोडया पाण्यात वाढवले आहेत. तिलापिया, पॅंगॅसियस, रुपचंदा, कॉमन कार्प हे मासे त्यांनी आपल्या शेततळ्यात व्यावसायिक धोरणातून वाढवले आहेत. जिवंत मासे ते विक्री करतात त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. दोन गुंठे व चार गुंठे क्षेत्राचे त्यांनी दोन कृत्रिम तलाव विकसित केले असून आठ ते दहा महिन्यामध्ये त्यांच्या या प्रकल्पातून विक्रीयोग्य मासे मिळत आहेत. भात शेतीनंतर ते शेतीतून काकडी, कलिंगड, भाजीपाला याचे उत्पादन घेतात. त्यांनी प्रायोगिक तत्वावर कुकुटपालनही सुरु केले आहे.
कोकणात शेती करत असताना, भाजीपाला लागवड करत असताना ज्या शेतकऱ्यांना काही समस्या येतात त्याना मार्गदर्शनही हे जाधव कुटुंबीय मनापासून करतात. खेकडा पालनही ते लवकरच सुरु करणार आहेत. शेती बरोबरच मत्स्योद्योग चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो हे रणजित जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. गुहागर कराड रोडवर पिंपळी येथे ते त्यांच्या माशांची विक्री करतात. त्यांच्या मते प्रथिनयुक्त आहार म्हणून गोडया पाण्यातील मासे हे खाद्यान्न म्हणून उपयुक्त असून स्थानिक पातळीवरून मागणी वाढल्यास स्थानिकांना योग्य प्रकारे रोजगार संधी व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता मत्स्योद्योगात आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares