सेवेत पुन्हा घेण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मागील आठ ते नऊ वर्षे फायलेरीया विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अचानक कमी करून त्यांच्या जागी नव्याने कर्मचारी भरल्याच्या विरोधात सोमवारी (ता. २१) सांयकाळी या कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. फायलेरीया विभागात सुमारे २०० कर्मचारी कंत्राटी स्वरूपात काम करीत होते; परंतु कोरोनाच्या आधी या कर्मचाऱ्यांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेण्यात यावे, त्यांचा थकीत पगार देण्यात यावा, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली. या शिवाय कंत्राटी कामगारांच्या इतरदेखील समस्या असून त्यांच्या लेव्हीची रक्कम दिली जात नाही, गणवेश दिला जात नाही, वेतनाच्या फरकाची रक्कमदेखील देण्यात आलेली नाही. समान काम समान वेतन लागू झालेले असतानाही त्यानुसार वेतन अदा केले जात नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या १५ दिवसांत यावर योग्य निर्णय आला नाही, तर पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares