पीक विम्याचा दावा करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते – BBC

Written by

फोटो स्रोत, Sandip autade
अतिवृष्टीमुळे मका पिकात साचलेलं पाणी.
महाराष्ट्रात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळे सोयाबीन, कापसासहित खरीप हंमागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
शेतमालाच्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी शेतकरी मागणी करत आहेत. यासोबतच पीक विमाही मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
पण, पीक विमा भरताना आणि नुकसानीच्या भरपाईचा दावा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, ते आता आपण जाणून घेणार आहोत.
पावसात काही दिवस खंड पडल्यास आणि त्यामुळे पिकांची वाढ बाधित झाल्यास, पीके सुकल्यास तर पीक विमा मिळेल असं शेतकऱ्यांना वाटतं.
त्यामुळे या नुकसानीविषयी शेतकरी कंपनीला माहिती देतात. पण, अशाप्रकारच्या नुकसानीसाठी पीक विम्याची भरपाई मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोगलगायींनी सोयाबीन पिकाचं नुकसान झालं.
याशिवाय पिकांचं कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याचं नुकसान होत असतं. पण, या बाबी नैसर्गिक आपत्तीत येत नाही.
त्यामुळे या बाबींविषयी शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली तरी त्याची भरपाई मिळत नाही.
फोटो स्रोत, Sandip autade
अविवृष्टीमुळे कपाशीची बोंडं सडली आहेत.
शेतकरी एखाद्या पिकाचा विमा ज्या तारखेस उतरवतात ती तारीख सगळ्यात महत्त्वाची असते.
पीक विमा ज्या दिवशी भरला जातो, त्या दिवसापासून त्याचं कव्हरेज सुरू होतं.
समजा तुम्ही 15 जुलै रोजी पीक विमा भरला आणि तुमच्या भागात 13 जुलैला पाऊस झाला, तर अशावेळी हे नुकसान पीक विम्यासाठी कव्हर केलं जात नाही.
म्हणजे 15 जुलैनंतर झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठीच तुम्ही अर्ज करू शकता.
पूर, ढगफुटी, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत त्याच्या माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.
ही माहिती देण्यासाठी चार पर्याय उपलब्ध असतात.
फोटो स्रोत, Sandip autade
एकदा का शेतकऱ्यानं त्याच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवली की मग नुकसान भरपाईसाठीची प्रक्रिया सुरू होते.
विमा कंपनी, कृषी विभाग यांचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करतात. यात तीन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात.
ही पाहणी केल्यानंतर मग त्यानुसार नुकसान भरपाईचा दावा निश्चित केला जातो.
खरीप हंगाम 2022 साठी राज्यातल्या 96 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या वर्षी ही संख्या 84 लाख इतकी होती.
आतापर्यंत पीक विम्यापोटी जवळपास 1 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केल्याचं महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
सोयाबीन सडलंय, कापसाची बोंडं काळी झालीत, आता दिवाळी गोड कशी होणार?
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares