मुंबईत पुन्हा छमछम, मनसेचा खळखट्ट्याकचा इशारा! मुख्यमंत्र्यांना पाठवला डान्स बारचा Video – News18 लोकमत

Written by

'चावट', बोलीभाषा अन् वाद, एकनाथ खडसेंवर माफी मागायची वेळ
उद्धव ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला? मंत्रालयातल्या बैठकीला हजेरी
ठाण्यात माझ्याविरोधात पोलिसांना आदेश कोण देते हे…, आव्हाडांच्या ट्वीटने खळबळ
त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतात, नजरा वेगळ्या; एकनाथ खडसेंची पुन्हा….
मुंबई, 22 नोव्हेंबर : राज्यात डान्सबारवर बंदी असताना राजधानी मुंबईत खुलेआम छमछम सुरू असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा छमछम सुरू झाली असल्याची बाब उघडकीस आली आहे. मनसेचे नेते नयन कदम यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करून माहिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मुंबईच्या कस्तुरबा मार्गातील पार्कसाईट 14 ते 15 बार अवैधपणे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचे मनसे नेते नयन कदम यांनी उघडकीस आणले आहे. या व्हिडिओमध्ये दारू पिऊन झिंगलेले काही तरुण नृत्य करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या ट्वीट मधून नयन कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला आहे. तुम्ही ठाण्यात तेरा बार तोडले आता आम्हीही बोरिवलीत बार तोडावेत का? त्यामुळे यावर कारवाई झाली नाही तर खळखट्याक आंदोलन केलं जाईल असा इशारच मनसेने दिल्याचं दिसत आहे.

#मुंबई #डान्सबार #बोरिवली #कस्तुरबामार्ग हद्दीत क्लब9, चारवॉक, पार्कसाईड बार सकाळी 4ते5 वाजेपर्यंत पैशाची उधळण, अश्लील नृत्य सुरू. @mieknathshinde साहेबांनी ठाण्यात 13बार तोडले, आता बोरीवलीत आम्ही बार तोडावे का? @mnsadhikrut @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mumbaimns @vishwasnp pic.twitter.com/nDAfqoR2Yw

कधी घातली बंदी?

दरम्यान, डान्स बारवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने ही डान्स बार बंदी करण्यात आली होती. 30 मार्च 2005 रोजी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राजधानी मुंबईत सुरू होते. पनवेलमधील डान्स बारमुळं तरुण पिढी कशी भरकटलीय, याकडे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांनी लक्ष वेधले. तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याही कानावर अशाच काही कथा आल्या होत्या. त्यांच्या तासगाव मतदारसंघातल्या अनेक तरुणांचे आयुष्य डान्स बारमुळे कसे बरबाद झाले, याच्या कहाण्या त्यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या आर. आर. पाटील यांनी डान्स बारवर बंदी घालण्याचं सूतोवाच विधानसभेत केले. त्यांनी फक्त घोषणा केली नाही, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून ऑगस्ट 2005 मध्ये राज्यातील डान्स बारवर खरोखरच बंदी घातली.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, MNS

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares