‘वाढवण’विरोधात मच्छीमारांचा मंत्रालयावर मोर्चा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
डहाणू, ता. २२ (बातमीदार) : प्रस्तावित वाढवण बंदरविरोधात मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी मुंबईतील आझाद मैदानावर विराट ‘आक्रोश मोर्चा’ काढत आंदोलन केले. या वेळी मोर्चातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सोमवारी (ता. २१) बंदराविरोधात निवेदन दिले. वाढवण बंदरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिली.
प्रस्तावित वाढवण बंदराला असलेला विरोध तीव्र करण्यासाठी डहाणू, पालघर, जव्हार, तलासरी येथील हजारो मच्छीमार आणि भूमिपुत्र मुंबईतील आझाद मैदानावर आले होते. ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारविरोधात मच्छीमारांनी जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. या आंदोलनात खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू, आमदार कपिल पाटील, आमदार सुनील शिंदे आदी सहभागी झाले होते.
मत्स्य व्यवसाय विभागाकडे पालघर जिल्ह्यातील दहा हजारापेक्षा जास्त नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत. या वर्षाच्या मासेमारी हंगामात ७,१३१ नौका कार्यरत आहेत. त्यावर पाच लाखाहून अधिक मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी, आदिवासी, बागायतदार, डायमेकर यांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी सरकारला जाब विचारण्यासाठी मुंबई आझाद मैदानावर धडक दिली होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares