PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा हप्ताही लांबला अन् शेतकऱ्यांची चिंताही वाढली, नेमके कारण काय? – TV9 Marathi

Written by

|
Sep 22, 2022 | 3:55 PM
राजेंद्र खराडे मुंबई :   पीएम किसान योजनेचा ((PM Kisan Scheme)) 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबत आहे. ग्रामीण भागातील गल्ली बोळात पीएम किसान योजनेतील निधीला घेऊन शेतकरी (Farmer) चिंतेत आहेत. गतवर्षी 9 ऑगस्ट रोजीच 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer Account) जमा करण्यात आले होते. त्यामुळे किमान सप्टेंबरमध्ये का होईना ही रक्कम पदरी पडेल अशी आशा होती. मात्र, अद्यापपर्यंत तारिखही जाहीर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सभ्रमतेचे वातावरण आहे. मात्र, जे नियमित लाभार्थी आहेत त्यांना आपले नाव यादीत आहे का नाही, हे देखील पाहता येणार आहे.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. 2018 पासून ही योजना सुरु आहे. शेती व्यवसयात या निधीचा वापर करता यावा हाच त्यामागचा हेतू आहे. मात्र, अनियमिततेमुळे अनेक खातेदारांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
ज्या खातेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यांच्याकडून पूर्वीपासून जमा झालेल्या निधीची वसुली केली जात आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी निर्माण होत आहेत. ऑगस्ट महिन्यात मिळणारा हप्ता आता सप्टेंबर अखेरीसही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.
पीएम किसान योजनेत नियमितता यावी या अनुषंगाने लाभार्थ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोणी योजनेचा लाभ घेतला आणि कोणी अनियमिततेच्या आधारवर पैसे लाटले त्यांच्याकडून ते वसुल केले जाणार आहेत.
पीएम किसान योजनेचा हा 12 हप्ता असणार आहे. गेल्या 5 वर्षापासून योजनेत सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत पुन्हा मोदींकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार का हे देखील पहावे लागणार आहे.
नाव चेक करण्यासाठी https://pmkisan.gov.in या होमपेजवर जावे लागणार आहेत. होम पेजवरील मेनू बारला क्लिक करुन ‘फार्मर कॉर्नर’वर जावे लागणार आहे. येथील लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर स्क्रीनवर पेज ओपन होईल. यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे चेक करीत आपले नाव शोधावे लागणार आहे.
पीएम किसन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार मिळतात. 4 महिन्यातून एकदा 2 हजार रुपये लाभार्थ्यांस दिले जातात. शेतकरी कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले. या योजनेच्या नियमानुसार पंतप्रधान किसानचे पैसे शेतकरी कुटुंबाला मिळतात. प्रत्येक सदस्याला असे नाही.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares