गुळ सौदे – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
गुळ सौदे दुसऱ्या दिवशी ठप्पच
कोल्हापूर, ता.२३ ः गुळाला ३ हजार ७०० रूपयांच्या पुढेच भाव द्यावा, कर्नाटकी गुळाचे आक्रमन थांबवावे अशा मागण्यासाठी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी शाहू मार्केट यार्डातील गुळ बाजारात ठिय्या आंदोलन केले. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशीही गुळ सौदे बंद राहिले. अमवस्याचे कारण सांगत व्यापारी सौद्यासाठी आले नाही तर शेतकऱ्यांनीही गुळ सौद्यासाठी आणला नाही. त्यामुळे आज सौदे होऊ शकले नाहीत. परिणामी मार्केट यार्डातील गुळ बाजार पेठेत शुकशुकाट होता.
गुळचा भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने गुळाला जादा भाव देण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. अखेर दोन्ही घटकांची बाजार समितीत बैठक झाली. त्यात कर्नाटकी गुळाला बाजारपेठेत येण्यास थांबवण्यात येईल तसेच गुळाला जास्तीजास्त भाव देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी व व्यापारी निघून गेले, सौद्याचा शिल्लक गुळ पडून राहिले.आज दुसऱ्या दिवशी मार्केट यार्डात शेतकरी व व्यापारी आलेच नाहीत त्यामुळे गुळ सौदे होऊ शकले नाहीत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares