जल आंदोलन पेटणार,आंदोलक शेतकऱ्यांचा संताप अनावर! – AIN NEWS TV – AIN NEWS

Written by

Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारात असलेल्या डमडम तलावात येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीन गेल्या 4 वर्षापासून पाण्याखाली आहेत. याबाबत येथील शेतकरी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने अनेक निवेदन जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनाला कळविले आहे. मात्र यावर प्रशासनाची भूमिका चालढकल करण्याची असल्याचे दिसून येत असल्याने येथील डमडम तलाव बुडीत क्षेत्र शेतकरी आणि आम आदमी पार्टी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी जल आंदोलन करणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश लोखंडे यांनी दिली.
यासंदर्भात आज सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेतकऱ्यांचा विजय असो,आमच्या मागण्या मान्य करा – नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांनी आतापर्यंत जमीन अधिग्रहणासाठी केलेल्या लढ्याची माहिती दिली आणि आंदोलनाची दिशा ठरविली आहे. तसेच येत्या 29 तारखेला जल आंदोलनाविषयी पूर्व मिटिंगचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश लोखंडे, माजी सरपंच साहेबसिंग गुमलाडू, ग्रा.सदस्य त्रिंबक जोनवाल, डमडम तलाव बुडीत क्षेत्र समितीचे संजय गुमलाडू, पुनमसिंग गुमलाडू, मदनसिंग गुमलाडू, त्रिंबक गुमलाडू, इंदलसिंग सुलाणे,पुनमसिंग सुलाने, अमोल गुमलाडू, केसरसिंग सुलाणे,भागचंद डेडवाल यांच्यासह पाणी बाधित शेतकऱ्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
रामलू निंभोरे AIN न्यूज खुलताबाद.
Prev Post
फुलंब्री नगरपंचायतला पाणी पुरवठ्यासाठी मिळाले 48 कोटी रुपये!
Next Post
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!
फुलंब्री नगरपंचायतला पाणी पुरवठ्यासाठी मिळाले 48 कोटी रुपये!
पैठणमध्ये एक महिन्यापासून गायब तरुणाचा दादेगाव शिवारात सापडला मृतदेह!
‘एमपीएससी’त बाजी मारणाऱ्या कविता काळेची सुलतानपूर येथील विद्यालयात…
भगतसिंह विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वाचन अभिव्यक्ती वाढीसाठी परिस स्पर्श कार्यक्रम!
माय लेकीच्या मृत्यूचे कारण बनली ती विहीर,पहिले मुलगी नंतर आई!

Leave A Reply


Your email address will not be published.
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
इंदिरा गांधींच्या 105 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचा विशेष कार्यक्रम!
विशेष कार्यशाळेस महसूल अधिकाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!
लव्ह जिहादचा खुनी खेळ थांबवण्यासाठी यावर बंदी घालण्याची मागणी!
राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा खुलासा!
Recent Posts
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

फुलंब्री नगरपंचायतला पाणी पुरवठ्यासाठी मिळाले 48 कोटी रुपये!
पैठणमध्ये एक महिन्यापासून गायब तरुणाचा दादेगाव शिवारात…source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares