Gondia Baby Death : दीड महिन्याच्या मुलाचा लसीकरणानंतर मृत्यू, गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री… – TV9 Marathi

Written by

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Jun 08, 2022 | 6:23 PM
गोंदिया : गोंदिया शहरात असेल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात आज लसीकरण (Vaccination) दरम्यान एका दीड महिन्याचा बालका (Baby)चा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी मयत बालकाच्या पालकांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुग्णालय प्रशासन आणि दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
गोंदियाच्या मामा चौक परिसरात राहणाऱ्या शारदा बोरकर या आपल्या दीड महिन्याच्या मुलाला लसीकरणाकरीता रुग्णालयात आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घेऊन आल्या होत्या. रुग्णालयात उपस्थित असलेल्या परिचारिकांनी शारदा यांच्या मुलाला दीड महिन्यानंतर दिले जाणारी रोग प्रतिकारक लस दिली. त्यानंतर रुग्णालयात काही वेळ थांबून शारदा या घरी जाण्यासाठी निघाल्या असता वाटेतच शारदा यांच्या दीड महिन्याच्या मुलाचे हृदयाचे ठोके बंद झाले. त्यानंतर त्यांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पालकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र आज सकाळी याच रुग्णालयात जवळपास 27 चिमुकल्यांचे लसीकरण करण्यात आले असून इतरांची प्रकृती स्वस्थ आहे. मात्र या बालकाला पोलिओचा डोस देताना परिचारिकेकडून बाळाचे नाक दाबले गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर डॉक्टरांनी बालकाला लसीकरणाचं इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट होईल. (One and a half month old baby dies after being vaccinated at a government hospital in Gondia)

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares