Maharashtra News Updates 23 November 2022 : दंगल घडविणाऱ्या आरोपींना 13 वर्षानंतर शिक्षा, पुसदमध्ये रामनवमी दर – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 23 Nov 2022 10:57 PM (IST)
Crime News : दंगल घडविणाऱ्या आरोपींना 13 वर्षानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. यवतमाळमधील पुसद येथे 2009 मध्ये राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. तेरा वर्षांपूर्वी उसळलेल्या दंगलीत जगदीश जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पुसद न्यायालयाने  तीन आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एन. एच. मखरे यांनी दिला. इम्रान खान, अस्लम खान, आरिफ खान, निसार खान, शेख निसार शेख नजुल्ला, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. या घटनेतील अन्य सात आरोपी अजूनही फरार आहेत. 
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातील दुधलम गावात बाप-लेकाचा कौटूंबिक वादातून खून झालाय. तर पत्नी गंभार जखमी झाली आहे. वडील प्रताप विठ्ठल पंडित (वय 52 )  आणि मुलगा सूरज प्रताप पंडित (वय 26 ) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिता प्रताप पंडित या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी अकोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटींची मदत,
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर.
दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत जाहीर.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही तात्काळ मदत जाहीर केल्याची चर्चा.
ही तोकडी मदत म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असल्याचं तुपकरांची प्रतिक्रिया, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार नाही, त्यामुळे उद्या होणारं जलसमाधीचं आंदोलन होणारच असा रविकांत तुपकर म्हणाले. 
हिंगोली ते मुंबई रेल्वे सेवा सुरू करा या मागणीसाठी आज हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे संघर्ष समिती आणि हिंगोलीकरांच्यावतीने रेल्वे रोखून आंदोलन करण्यात आले. अमरावती-तिरुपती एक्सप्रेस आंदोलकांनी रोखून धरली होती. या आंदोलनात मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोलीकरांचा सहभाग होता. या आंदोलनप्रकरणी रेल्वे कायद्यानुसार 17 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा बल बाह्य चौकी हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : मुंबई उपनगराततील दुचाकी चोरून सातारा सांगली मधील गावांमध्ये 20-25 हजार रूपायांत विकणाऱ्या एका टोळीला घाटकोपर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आता पर्यंत 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अंकित मिश्रा , किरण पाटील आणि गणेश सावंत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घाटकोपर  ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणत दुचाकी चोरीचे गुन्हे घडत होते. या अनुषंगाने तपास करीत असताना पहाटे तीन ते पाच वाजताच्या सुमारास ही दुचाकी चोरणारी टोळी गाड्यांची चोर करत असल्याचे सीसीटीव्ही  समोर आले. पोलिसांनी सिसिटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने प्रथम यातील अंकित मिश्रा याच्याकडे चौकशी केली. नंतर गणेश सावंत आणि किरण पाटील पाटील यांना पोलिसांनी मानखुर्द मधून अटक केली. यातील अंकित हा दुचाकी शोधायचा. तर किरण हा दुचाकी शोरूममध्ये कामाला असल्याने दुचाकी डायरेक्ट चालू करण्याचे आणि सावंत त्यांला सहकार्य करण्याच काम करीत होता. मात्र मोठ्या शिताफीने घाटकोपर पोलिसांनी ही टोळी गजाआड केली आहे. 
Money Laundering Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांच्या जामीन अर्जावर आता 8 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कुंदन शिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, कुंदन शिंदे यांच्या जामीनाला सीबीआयचा विरोध आहे.  
Pune News Update : पुण्यातील नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंट जवळ आणखी एक अपघात झालाय. सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच  आहे. एका कंटेनरने चारचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झालाय. यात चारचाकी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  
Pune News Update : पुण्यातील महा मेट्रोच्या कार्यालयावर शेकडो नागरिकांनी धडक दिलीय. घोले रोड येथील मेट्रोच्या कार्यालयावर मोठ्या सख्येने नागरिक आले आहेत. मेट्रो मार्गावर कामगार पुतळ्याजवळ सुरु असलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना पर्यायी व्यवस्था देण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव, तसेच पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मेट्रो करून पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सोयी मिळत नाही, तसेच मेट्रो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.  
मस्ती मस्तीत तीन ते चार मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राच्या पार्श्वभागात लाकडी लाटणं घातल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलंय. 
जलसमाधी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जालन्याहुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोयाबीनच्या नुकसानीसह विविध मागण्यांसाठी उद्या जलसमाधी आंदोलनावर ठाम असलेल्या स्वाभिमानाच्या रविकांत तुपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस आल्याची माहिती  त्यांनी दिलीय. मुंबई येथे जाताना जालन्यातील भोकरदन येथील कार्यकर्त्यांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सरकारला शेतकऱ्यांची प्रेतंच बघायची असतील तर उद्या मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावरून ही प्रेतं तरंगताना दिसतील असा इशारा देखील  त्यांनी दिलाय.
CM Eknath Shinde: एकही गाव राज्याबाहेर जाणार नसल्याचे सांगत जतमधील पाण्याचा प्रश्न मार्ग लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. 
जतमधील गावांची मागणी 2012 साली करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जावू देणार नाही. हा प्रश्न सामोपचाराने सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सीमावाद हा न्यायालयात आहे. त्यामुळे सीमा प्रश्नात आणखी कोणी वाद निर्माण करू नये. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  
Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे पाटणामध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. 
Beed News : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं यापूर्वी राज्यपालांची टोपी आणणाऱ्याला शिवसेनेकडून बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं, आता काँग्रेसने राज्यपालांचा शर्ट आणणाऱ्याला एक लाख रुपयांचा बक्षीस जाहीर केल आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यपालांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप सरकार जाणून-बुजून महापुरुषांची बदनामी करत आहे, असा देखील आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. 
Beed News : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष भाजपासोबत घटक पक्ष म्हणून निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाचे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र आता मुंबईमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपासोबत घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली 
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला विशेष महत्त्व
राज्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा शरद पवार घेणार असल्याची सूत्रांची माहिती
Beed News : बी.एस्सी.च्या परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या फक्त एकाच विद्यार्थिनीचे हॉलतिकिट आले. इतर जवलपास 100 विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट न आल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. 
100 विद्यार्थ्यांपैकी केवळ एकाच विद्यार्थीनीचे हॉल तिकिट आले. इतर विद्यार्थ्यांचे मात्र हॉल तिकिट आले नसल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पीआरएन नंबरवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा आज होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालं असल्याचं महाविद्यालयानं जाहीर केलं आहे. 
Hingoli Railway Issues : हिंगोली ते मुंबई अशी रेल्वे फेरी सुरू करावी ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. परंतु प्रशासन याला गांभीर्यानं घेत नसल्यानं आज अखेर रेल्वे संघर्ष समिती आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. नागरिक रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढून रेल्वे रोखणार आहेत. तर सोलापूरमधील होडगीर रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सेवा सुरू भावी यासाठी गेल्या 17 दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. सोलापूर विकास मंचाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे. विमानतळाच्या शेजारीच असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत आहे. विमानसेवेचा हा अडथळा दूर करण्याचे निर्देश DGCA मी दिले होते. त्यानुसार प्रशासनानं देखील चिमणी हटवण्याची नोटीस कारखान्याला दिली होती. मात्र न्यायालयात गेल्यानं अनेक वर्षांपासून चिमणीचा अडथळा अद्याप कायम आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे विमान सेवा सुरू होत नसल्याचा आरोप सोलापूर विकास मंचाचा आहे. 
Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या गाड्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये कार आणि दुचाकी थेट जप्त करण्यात आल्या. उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गाला लागूनच अनेक कार डेकोरेशन आणि कार रिसेल डीलर्सची दुकानं आहेत. हे दुकानदार त्यांच्याकडील कार्स रस्त्यावर लावून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यात गॅरेज चालक सुद्धा रस्त्यावरच दुचाकी आणि कार रिपेअरिंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याबाबत तक्रारी आल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या गाड्या थेट जप्त केल्या. सोबतच रस्त्यात या गाड्या लावणाऱ्यांकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आला. उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. 


Nashik News : नाशिकच्या वडाळा रोडवरील आयेशा नगर परिसरात रात्री साडेदहा आकाराच्या सुमारास बिबट्या आढळून आला. एका घराच्या पार्किंगमध्ये गाडी खाली बिबट्या बसला होता. नागरिकांची चाहूल लागताच, त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. बिबट्या दिसताच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं. गेल्या काही दिवसांपासून शहरा लगतच्या गावात बिबट्याची दहशत बघायला मिळतेय, मात्र आता थेट शहरात बिंबट्या आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवानं बिबट्याच्या हल्ल्यात कोणीही जखमी नाही. बिबट्यालाही कुठलीही इजा झाली नाही. 
Nagpur Crime : नागपुरात रेशन धान्य खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 300 पोती धान्य जप्त केले आहे. दुचाकीवरून धान्य घेऊन जाताना पोलिसांना एका तरुणावर संशय आला. त्याची विचारपूस केली असता यात रेशनचे धान्य वेगवेगळ्या वस्त्यांमधून खरेदी करून मांजरी परिसरात गोडाऊनमध्ये जमा करत असल्याचे सांगितले. हेच धान्य नंतर मोठ्या बाजारातील मोठ्या धान्य विक्रेत्यांना विकत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गोडाऊनवार धाड टाकून गहू, तांदूळ धान्यासह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अकबर खान इब्राहिम खान (46), तनवीर शेख शब्बीर शेख (23), अभय कुंडलिक डायरे (21) अटकेतील तिघांचे नाव असून कैफ बिल्लू फरार झाला असून तहसील पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Nagpur Fire : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री दोन वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झालीेये. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मात्र या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला होता.
Earthquake in Palghar : पालघरमध्ये आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी  बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागांत मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच आहे. हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवानं आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले असून या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे बुधवारी बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. पक्षाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. 
महाराष्ट्र महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आणि मविआ सरकार कोसळे. याच्याच काही दिवसानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. याच कारण म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचं मत हे परिणामकारक ठरू शकतं. 
Nashik Crime : नाशिकमधून मोठी बातमी; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील चिमुकल्याची हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस 
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ असलेल्या एका अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. या आश्रमातील एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा
एकीकडे फुटबॉलचा महासंग्राम फिफा विश्वचषक (Fifa World Cup 2022) सुरु असताना फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबपासून वेगळा झाला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. मँचेस्टर युनायटेडनं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन हे ट्वीट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबवर खासकरुन क्लबचे मॅनेजर एरिक यांच्यावर आरोप केले होते, ज्याचे पडसाद आता उमटल्याचं दिसून येत आहे.
क्लबने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने हा निर्णय घेत असून तात्काळ रोनाल्डो क्लबपासून वेगळा होत आहे. तसंच क्लबमध्ये त्याच्या दोन्ही कारकिर्दीबद्दल आम्ही आभार मानतो. त्याने क्लबकडून 346 सामन्यांम्ध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तसंच मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि संघाला आणखी यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
वृद्धाश्रमात जागा नसणाऱ्यांना राज्यपाल नेमलं, केंद्राने हे ‘सँपल’ परत न्यावं अन्यथा इंगा दाखवू; उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा
कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
Uddhav Thackeray : शिंदे सरकार आल्यापासून कुणीही यावं आणि टपली मारुन जावं असे प्रकार सुरु- ठाकरे
बोम्मई जे बोलले ते भाजपच्या वरिष्ठांना विचारून बोलले का? केंद्र महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळतंय; सीमाप्रश्नी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांचे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची माहिती

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares