Maharashtra Political News Live : अंनिसची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका – Zee २४ तास

Written by

Maharashtra Political News: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स 

 

 

 
 
23 Nov 2022, 22:50 वाजता
मुख्यमंत्री शिंदे हात दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे?
Criticism on Chief Minister Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. शिर्डीत (Shirdi) साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपलं भविष्य पाहण्यासाठी मुख्यमंत्री सिन्नर मिरगावच्या (Mirgaon) ज्योतिषाकडे गेल्याची चर्चा रंगलीय. शिर्डी दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा अचानक मिरगावच्या दिशेनं वळवला, तिथे श्री क्षेत्र  ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी महादेवाची सपत्नीक पूजा केली. एका बड्या राजकीय ज्योतिषी बाबाचं हे मंदिर आहे. त्याच्याकडून शिंदेंनी यापूर्वीही भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीतून चुकीचा संदेश गेल्याची टीका महाराष्ट्र अंनिसनं केलीय (Maharashtra Political News).
बातमीची लिंक- https://bit.ly/3EBfzHA
23 Nov 2022, 20:19 वाजता
बुलढाणा, वाशिम जिल्ह्याला 157 कोटींची मदत जाहीर
Government help after Tupkar’s warning: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या(Ravikant Tupkar) इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आलीय. बुलढाणा(Buldhana) आणि वाशिम(washim) जिल्ह्याला 157 कोटींची मदत जाहीर करण्यात आलीय. यात कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रूपयांची तर बागायतदार शेतकऱ्यांना 27 हजारांची मदत जाहीर केलीय. मात्र सरकारनं जाहीर केलेली मदत तोकडी आहे असा आरोप करत तुपकरांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तुपकरांनी केलीय. तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह उद्या अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत (Maharashtra Political News). 
बातमीची लिंक- https://bit.ly/3V3zAh4
23 Nov 2022, 18:46 वाजता
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात
Pune Accident: नवले पुलाजवळील (Navale Bridge) सेल्फी पॉइंट जवळ एक अपघात झालाय. एका कंटेनरने चारचाकीला पाठीमागून धडक दिली. ह्यात चारचाकी वाहनांचे नुकसान झालंय. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.परंतू पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पुन्हा अपघात झाल्यानं हे अपघात कधी थांबणार असा सवाल उपस्थित झालाय. 
बातमीची लिंक- https://bit.ly/3gy87W0
23 Nov 2022, 17:51 वाजता
एकही गाव कर्नाटकात जाणार नाही- मुख्यमंत्री
Shinde-Fadanvis on Jat : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे (Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Fadanvis) यांनी दिलीय. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार, सीमावादावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याची फडणवीस यांची माहिती. जतमधील गावांचा ठराव 2012 सालचा, ‘म्हैसाळ योजना तातडीनं लागू करणार’, नव्याने कोणताही ठराव झालेला नाही- फडणवीस. तर हे ईडी सरकार इंग्रज सरकाराप्रमाणे वागतंय. यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलीय  (Maharashtra Political News).
बातमीची लिंक- https://bit.ly/3EWIveI
23 Nov 2022, 16:34 वाजता
दिशा सालियनचा अपघाती मृत्यू-CBI
Accidental death of Disha Salian: सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput)मॅनेजर दिशा सालियनचा (Disha Salian)मृत्यू अपघाती झाल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. मद्यधुंद अवस्थेत 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न. 28 वर्षीय टॅलेण्ट मॅनेजर दिशा सालियनने काही काळ सुशांतसिंह राजपूतसह काम केलं होतं. सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यूप्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला. त्यात दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती. दरम्यान सीबीआयकडे पुरावे नसल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केलीये तर टिका करणा-यांनी माफी मागावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केलीये (Maharashtra Political News).
बातमी पाहा- सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं कारण अखेर समोर
23 Nov 2022, 14:51 वाजता
कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्र्यांसह लावलेली पोस्टर्स अखेर पोलिसांनी काढले
Kolhapur Hording (Maharashtra News Updates) : कोल्हापुरात कुख्यात गुंड अमोल भास्कर याने मुख्यमंत्र्यांसह (Cm Eknath Shinde) लावलेली पोस्टर्स अखेर पोलिसांनी काढून टाकलीय. ‘झी 24 तास’ने ही बातमी दाखवल्यावर पोलीस आणि मनपाने कारवाई करत ही पोस्टर्स काढून टाकली. कुख्यात गुंड अमोल भास्करवर खून, सावकारी, खंडणी, मारामारी अशा अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्टर्स त्याने लावली होती. मात्र झी २४ तासच्या दणक्यानंतर पोलिसांनी पोस्टर्स काढण्यात आली,   (Maharashtra News Updates) 
बातमी पाहा-  कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्र्यांसह झळकले कोल्हापूरात पोस्टर
23 Nov 2022, 14:27 वाजता
Ravikant Tupkar ( Maharashtra Political News) : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) नोटीस बजावलीय. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झालेत. त्यामुळेच त्यांनी मुंबईत 24 नोव्हेंबरला अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय. रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी बुलढाण्यावरुन मुंबईकडे रवाना झालेत. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलीय.  ( Maharashtra Political News)
23 Nov 2022, 12:44 वाजता
Ajit Pawar Live ( Maharashtra Political News) : ‘जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणू नका’, ‘शेतकरी संकटात असताना वीज कनेक्शन कट करण्याचे धंदे’, ‘वीज कनेक्शन कट करण्याच्या निर्णयानं शेतकरी त्रस्त’, अजित पवार यांचा राज्य सरकारला टोला
23 Nov 2022, 12:37 वाजता
Ajit Pawar Live ( Maharashtra Political News) : ‘अधिवेशन जास्त काळ चाललं पाहिजे’,’पीकविम्यांची रक्कम अतिशय तुटपुंजी’,’अतिवृष्टग्रस्तांना मदत मिळत नाही’, शेतकरी आत्महत्येत घट नाही, आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांच्या संघटनांना चर्चेला बोलवावं, अजित पवार यांची मागणी.
23 Nov 2022, 12:17 वाजता
Aditya Thackeray  ( Maharashtra Political News) : ‘मुख्यमंत्र्यांकडे राज्यासाठी अर्धा तास नाही’,’राज्यात प्रश्न असताना कॅबिनेट रद्द’,’प्रकल्पांपाठोपाठ आता परराज्यात मंत्रीही गेले’ आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला. 
 
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares