Video : स्टोन क्रशरमुळे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड, अधिकाऱ्यासमोर शेतकरी ढसाढसा रडला – News18 लोकमत

Written by

ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार जनरल डायर प्रमाणे…, सुप्रिया सुळेंची सडकून टीका
19 आणि 20 तारीख मुंबईकरांसाठी डोकेदुखी, रस्ते वाहतूक आणि लोकलचा मेगा ब्लॉक
जागेवरुन लोकलमध्येच दोन गटांत तुंबळ हाणामारी, नालासोपाऱ्यातील घटनेचा Video
बुलाती है मगर जाने का नहीं! वृद्धाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 14 लाखांना लावला चुना
सांगली, 23 नोव्हेंबर : स्टोन क्रेशरच्या धुळीमुळे पीक वाया गेल्याने सांगलीतील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड घातली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच होत असलेल्या नुकसानीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पाहणीसाठी प्रदूषण महामंडळचे अधिकारी पोहचले असता, पीडित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याचे पाय धरले. यावेळी शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. 
सांगलीतील भोसे जाधव वस्तीलगत श्लोक हायटेक स्टोन क्रेशर आहे. येथील धूळ परिसरातील पिकावर बसून 85 एकर शेतीचे नुकसान चार वर्षापासून होत आहे. जवळपास 200 ते 225 शेतकऱ्यांच्या शेतात लावलेले कडधान्य, द्राक्ष बाग, भाजीपाला पिकावर धूळ बसल्याने पीक जळून जात आहेत. धुळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वयाच्या 23 व्या वर्षी केली शेतीत क्रांती, अनोख्या संकल्पनेमुळे मिळाला पुरस्कार
आंदोलनाचा इशारा
स्टोन क्रेशर याठिकाणी आल्यापासून शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. पिकांवर धुळीचा थर बसल्याने पिकांचे प्रकाश संश्लेषण होत नसल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांना उभ्या पिकावर कुऱ्हाड घालण्याची वेळ आली. नुकसान पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. तीन ते चार वर्षे झाले येथील शेतकरी स्टोन क्रेशर बंद करण्याची मागणीसाठी लढा देत आहेत. पण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या पंधरा दिवसात स्टोन क्रेशर बंद झाला नाही तर कुटुंबासोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल 
दरम्यान, भोसे येथील स्टोन क्रेशरच्या धुळीमुळे शेतकऱ्यांची पूर्ण शेती धोक्यात आली होती. सांगलीच्या प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी, भोसे येथील शेती आणि स्टोन क्रशरचा पंचनामा केला आहे. टोन क्रशरच्या धुळीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचं निष्पन्न झाले आहे. लवकरचं याबाबतचा अहवाल तयार करून पुढे पाठवला जाईल असे सांगण्यात आले आहे. 
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Sangli

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares