कसबा सांगाव: आम हसन मुश्रीफ कार्यक्रम.. – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
01085
कसबा सांगाव ः येथे आमदार मुश्रीफ, संजय घाटगे, युवराज पाटील यांचा सत्कार करताना सरपंच कांबळेंसह सदस्य.
मंत्रिपदाच्या काळात
लोकोपयोगी निर्णय
आमदार मुश्रीफ; कसबा सांगावला लोकार्पण सोहळा
कसबा सांगाव, ता. २० ः मंत्रिपदाच्या काळात शिवराज्याभिषेक दिन, सैनिकांचा घरफाळा माफ आणि विधवा महिलांना सन्मान देणारा कायदा हे तीन ऐतिहासिक निर्णय घेतले. विकासकामांसाठी इतका निधी देता आला, याचे श्रेय जनतेचेच आहे; असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
कसबा सांगाव येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा, सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार संजय घाटगे प्रमुख उपस्थित तर गोकुळचे संचालक जि. प. सदस्य युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते.
ते म्हणाले, ‘अनेक वर्षांची समस्या सोडवू शकलो याचे समाधान आहे. बिळात लपलेले आमच्या कामाचे श्रेय घेताहेत.’ संजय घाटगे म्हणाले, ‘आमदार मुश्रीफ यांना आयुष्यभर पाठिंबा देणार आहे.’ युवराज पाटील यांनी, दहा कोटींचा निधी आणून दाखवा, असे आव्हान दिले. स्वागत सरपंच रणजित कांबळे यांनी तर प्रास्ताविक किरण पास्ते यांनी केले. भैय्या माने, मोहन आवळे, अनिला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नविद मुश्रीफ, माजी सरपंच बाबासाहेब लबाजे, सुळकूडच्या सरपंच सुप्रिया भोसले, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, कृष्णात पाटील, अमर कांबळे, बाळासो लोखंडे, संतोष माळी, सुरेश लोखंडे, इनायत मुल्लांसह ग्रा.पं. सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेरो शायरी आणि टोलेबाजी…
संजय गांधी निराधार योजनेवरील भैय्या माने यांनी, नाव न घेता समरजित घाटगे यांच्यावर जोरदार टीका केली, तर संजय घाटगे यांनी दिलेल्या पाठिंब्यावर आम हसन मुश्रीफ यांनी ये दोस्ती हम नही तोडेंगे….हमे और जिने की….अशी शायरी म्हणताच उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares