‘डीकेएएससी’ संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
04983
इचलकरंजी : विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या डीकेएएससी कॉलेजच्या संघासमवेत मार्गदर्शक प्राध्यापक.
‘डीकेएएससी’ संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी डीकेएएससी कॉलेजच्या संघाची निवड झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय शालेय क्रिकेट स्पर्धेत कॉलेजच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात कन्या महाविद्यालयाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. संघाची सातारा येथे होणाऱ्या विभागीय विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात कर्णधार मृणाली खोत, उपकर्णधार समीक्षा अडसुळे, अंकिता मिश्रा, समृद्धी माळी, आम्रपाली कांबळे, संध्याराणी कोळी, सृष्टी कगुडे, रसिका वने, प्रतीक्षा अडसुळे, गीता बारीक, वैष्णवी शिंदे, सुरेखा फरकटे, मिजान ऐतवडे, सोनल खोत, स्नेहल पुजारी, श्रावणी सांगावी या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी. ए. यादव, अधीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते सत्कार केला. संघास प्रा. मेजर मोहन वीरकर, प्रा. मुजफ्फर लगीवाले, प्रा. प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
———–
04982
इचलकरंजी : विनायक हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली.
विनायक हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
इचलकरंजी : विनायक हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. क्रीडामहोत्सवाची सुरुवात श्री म्हसोबा देवस्थान येथून क्रीडाज्योत आणून केली. ध्वजपूजन आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सचिन हेरवाडे यांनी केले. ध्वजवंदन राजू कबाडे यांनी केले. मुख्याध्यापक अशोक हुबळे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन चव्हाण यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सेक्रेटरी अशोक चव्हाण, अदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अनिल बमन्नावर, मधुकर कदम आदी उपस्थित होते. क्रीडाशिक्षक सागर पाटील यांनी क्रीडा शपथ दिली. सूत्रसंचालन सौ. मिनाज पटेल यांनी केले. शाम कांबळे यांनी आभार मानले.
——–
महाआरोग्य शिबिर
इचलकरंजी : येथील आसरानगर परिसरात मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर झाले. साईट क्रमांक १०२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याननजीक हे शिबिर होणार आहे. शिबिरात मोफत डोळे, जनरल तपासणी, औषधोपचार, ईसीजी, शुगर तपासण्या होणार आहेत. रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
————-
‘शेतकरी सन्मान’च्या लाभाची मागणी
इचलकरंजी : २०१७ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही, तरी या योजनेचा लाभ मिळावा, या मागणीचे लेखी निवेदन शिरदवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना पाठवले आहे. योजनेसाठी गावातील शेतकऱ्यांचा पैसा व वेळ खर्च पडत आहे. त्याला कंटाळून शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता, तरीही याकडे दुर्लक्ष केले. महिनाभरात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
————
‘सर्वोदय’मध्ये क्रीडा महोत्सव सुरू
इचलकरंजी : सर्वोदय विद्यालयाच्या क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ज्योत प्रज्वलित केली. इस्माईल समडोळे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. मुख्याध्यापिका आस्मा नदाफ, क्रीडाप्रमुख शीतल पाटील, नरसिंह महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाग्यश्री पुजारी यांनी केले.
———-
बँकिंग-फ्रॉड्सबाबत चर्चासत्र
इचलकरंजी : महेश सेवा समिती येथे बँकिंग-फ्रॉड्सबाबत चर्चासत्र झाले. समाजसेवी संस्था, महेश नवयुवक मंडलतर्फे आयोजन केले. ऑनलाइन-बँकिंगच्या अनेक सोयी-सुविधा असूनही सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचे वारंवार निदर्शनात येत आहे. बँकिंग फसवणुकीवर सायबर क्राइम क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच बँक अधिकारी कमल गांधी यांनी मार्गदर्शन केले. १८० हून अधिक व्यापाऱ्यांनी लाभ घेतला. विविध बँकिंग समस्यांवर सल्ला मिळाला. महेश नवयुवक मंडलचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड, सचिव अमितकुमार कावरा, नरेश काबरा, संजय कदम आदी उपस्थित होते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares