देऊळगाव राजे परिसरामध्ये चार दिवसांपासून वीज खंडित – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
देऊळगाव राजे, ता.२४ : येथील (ता.दौंड) परिसरातील गावामधील शेतीपंपाचा वीजपुरवठा चार दिवसांपासून खंडित केला आहे. पावसाच्या नुकसाणीतून शेतकरी अद्यापही सावारलेला नसताना महावितरण कंपनीने बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतीपंपाचा पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतातील कपाशी, सोयाबिन, उडीद, ऊसाच्या लागवडी वाया गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन एक महिना होउनही शासनाची मदत मिळालेली नाही. पावसामुळे अनेकांच्या शेतीला वाफसा आलेला नाही तर वाफसा झालेल्या काही शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, कांदा पिंकाची पेरणी केलेली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या अगोदरच महाविरणने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिंकाना पाणी कसे घावे असा मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. सध्या विजबिल भरण्यास सरकार सांगत आहे. परंतु सध्य स्थिती ते शक्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares