‘माडखोलकर’मध्ये ग्रामीण पत्रकारीता अभ्यासक्रम – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘माडखोलकर’मध्ये ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रम
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमाला सुरवात झाली आहे. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत हा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी त्याचा लाभ होऊ शकतो. इच्छुकांनी डॉ. जी. वाय. कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
———————————-
मोक्षदा एकादशीनिमित्त चंदगडहून ग्रंथदिंडी
चंदगड ः मोक्षदा एकादशीनिमित्त यावर्षी ३ ते ५ डिसेंबरदरम्यान येथील रवळनाथ मंदिर ते देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ देवालयापर्यंत पायी ग्रंथदिंडी व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. भाविकांनी सोहळ्यात सहभागी होऊन शोभा वाढवावी, असे आवाहन संभाजी चिरमूरकर यांनी केले आहे.
———————————
आमरोळीत आज स्वाभिमानीचा रास्ता रोको
चंदगड ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उद्या (ता. २५) ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. चंदगड- गडहिंग्लज मार्गावर आमरोळी येथे हे आंदोलन होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares