शहापूर-बामणे रस्त्याला शेतकऱ्यांचा विरोध – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
खर्डी, ता. २४ (बातमीदार) ः मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी शहापूर जोडरस्ता करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी लागणाऱ्या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. गोठेघर, कांबारे, बामणे या तीन गावांतील २५ बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन थांबवा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

समृद्धी महामार्गास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ शहापूर येथून बामणे – सापगाव – खुटघर – कोळकेवाडी असा समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यापर्यंत चारपदरी रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याचे कामही सुरू आहे. मग शेतकऱ्यांची शेती व घरे उद्ध्वस्त करणारा शहापूर ते बामणे हा समृद्धी महामार्गाला जोडणारा पर्यायी राज्य मार्ग क्र. २ हा वळणदार रस्ता कशासाठी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. हा प्रकल्प अनुसूचित क्षेत्रात येऊनही याबाबत शेतकऱ्यांना एका दैनिकात अधिसूचनेद्वारे नोटीस जाहीर करण्यात आली होती. याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. शासनाने या रस्त्यासाठीच्या १३ एकर २० गुंठे जमीन भूसंपादनासाठी घातलेला घाट, शेतकऱ्यांना भूमिहीन व बेघर करणारा असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. समृद्धी महामार्गाला जोडणारा शहापूर वळणदार जोडरस्ता हा शेतकऱ्यांना भूमिहीन व बेघर करणारा रस्ता आहे. शहापूर -बामणे रस्त्याचे भूसंपादन न थांबविल्यास आम्ही आंदोलन करू, असे गोठेघर येथील शेतकरी हरिश्चंद्र डिंगोरे म्हणाले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares