शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी द्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
इंदापूर, ता.२४ : कोरोनामुळे सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. आता सरकारचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यामध्ये थकीत वीज बिलाअभावी अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भरणे यांनी वीज कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी भरणे बोलत होते.
या वेळी भरणे म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देताच त्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडला जाईलच. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या सरकारपर्यंत कळवाव्यात. एक बिल भरणे कोणालाही मान्य नाही. यामुळे शेतकरी कायदा हातात घेतील आणि मोठे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी महावितरणचे बारामती कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे अधिकारी राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिण्याचे पाणी तोडाल तर याद राखा..
काही गावातील नागरिकांनी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे जोड तोडल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी आमदार भरणे आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम देत पिण्याचे पाणी तोडाल तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे, असा दम भरला. यापुढे पाण्याच्या कनेक्शनचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही याची काळजी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक
इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचे पूर्ण पैसे अद्यापही दिलेले नाहीत. आधी ते पैसे द्यावेत. तसेच सध्या गाळप होत असलेल्या उसाचे बिलही मुदतीत जमा करावे व नंतरच विजेच्या थकबाकीतील चालू बिल भरण्याचे आवाहन करावे, असा आक्रमक पवित्रा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला.

02413
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares