शेती व कृषी पर्यटनाचा स्रोत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मावळ तालुक्यात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या परिसरात आल्यानंतर पवना धरण, लोहगड, तिकोना, तुंग व विसापूर हे ऐतिहासिक किल्ले याशिवाय बेडसे लेणी अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालत असतात. कृषी पर्यटन हा एक शेती व्यवसायासोबत आर्थिक फायदा करून देणारा स्तोत्र आहे.
– विकास गोसावी, कृषी साहाय्य, कृषी विभाग मावळ

गेल्या काही वर्षात राज्यातील शेतीक्षेत्राला अवकाळी पावसाचा वारंवार फटका बसत आहे. त्याला मावळ तालुकाही अपवाद ठरलेला नाही. त्यातच मावळातील पावसाळ्यातील पडणाऱ्या पावसाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे लागवडीचा बदलत चालेला कालावधी, कुशल मनुष्यबळाचा (मजुरांचा) तुटवडा, बहुतांशी शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणांचा वडिलोपार्जित पारंपरिक शेती करण्याकडे दिसत असलेला निरुत्साहामुळे शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला मावळ तालुका पुणे-मुंबई या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेला तालुका आहे. लोणावळा-खंडाळा या पर्यटनस्थळाचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. या परिसरात वर्षभरात सुमारे १५ ते २० लाख पर्यटकांची वर्दळ पाहावयास मिळते. मावळ तालुक्यात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या परिसरात आल्यानंतर पवना धरण, लोहगड, तिकोना, तुंग व विसापूर हे ऐतिहासिक किल्ले याशिवाय बेडसे लेणी अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालत असतात. कृषी पर्यटन हा एक शेती व्यवसायासोबत आर्थिक फायदा करून देणारा स्तोत्र आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्याला फाटा आधुनिक शेती करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत असून, त्याचा दृश्य परिणाम वाढत्या उत्पादनातून दिसू लागला आहे. यापुढील काळात आधुनिक तंत्राचा, इंटरनेट सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त वापर करून शेतकरी प्रगतशील स्मार्ट बनविण्याकडे कृषी विभाग प्रयत्नशील असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणे वाटते तेवढं सोपे काम नाही पण शेतकऱ्यांनी मनावर घेतले तर अशक्य ही नाही. शेतकऱ्यांचा शेतीबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मावळात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने भातपीक हे मुख्य असले तरी काही शेतकरी प्रामुख्याने भात लागवडीसाठी पारंपरिक भात लागवड पद्धतीचा अवलंब करीत होते. मात्र, कृषी विभागाकडून सातत्याने होत असल्याने भात उत्पादन वाढीसाठी मैलाचा दगड ठरलेली ‘चारसूत्री भात लागवड पद्धत मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत. तालुक्यातील भात लागवडीच्या ऐकून क्षेत्राच्या जवळपास निम्मे क्षेत्र हे चारसूत्री लागवड पद्धतीने लावले जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून नवीन वाण लागवडीची प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, युरिया ब्रिकेट वापर, बीजप्रक्रिया, सगुणा राइस तंत्र (एस. आर. टी. लागवड ), यंत्राने भात लागवड, यामुळे भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने चालू वर्षी या तंत्राने शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना विशेष माहिती देऊन प्रोत्साहन दिले आहे.
शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे, नवीन बियाणे, अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा वापर करणे आवश्यक आहे. मावळातील शेतीत आधुनिक तंत्राचा अभाव, पावसाची अनिश्चितता, तापमानात वाढ, मजूर समस्या आदी समस्यांमुळे गेल्या काही वर्षात उसाचे हेक्टरी उत्पादन कमी होत असल्याचे दिसून आले आहे. आता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढविण्यात यश आल्याचे दिसू लागले आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना ऊस विकास कार्यक्रम, ऊस पाचट व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी लागवडीच्या विविध आधुनिक पद्धती, आंतरपिके, सूक्ष्मसिंचन अवलंब करणे, दर्जेदार बियाणे वापरास प्रोत्साहन, ऊस बियाणे बिजप्रक्रिया, सेंद्रिय खताचा वापर शेतकरी करू लागले आहेत.

मावळात यंदा भात, गहू, उसापाठोपाठ टोमॅटो या महत्त्वाच्या पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पॉलिथिन पेपरचा वापर, ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व खत देणे, स्मार्टफोन वरून हवामानाचा अंदाज, बाजारभाव यासह कृषियांत्रिकीकरण योजनेचे महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, पीक विमा योजना, कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेणे या सर्व बाबी ऑनलाइन व्यवस्थितपणे शेतकरी करताना दिसत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असून, त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे हे शेतकऱ्यांनी जाणले आहे व ते करणे अनिवार्य आहे. आधुनिक तंत्राने शेती करताना प्रामुख्याने नियंत्रित-हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल, पॉलिहाऊसमध्ये उच्च दर्जाचा भाजीपाला भाजीपाला व फुलपिके लागवड करणे, परागीकरणासाठी मधुमक्षिकापालन करणे, पॅकहाउस उभारणे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे, साठवणगृह, आधुनिक पद्धतीने कांदा चाळ उभारणे, शेतीसाठी पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी ठिबक सिंचन, तुषारसिंचन पद्धती वापरणे, माती परीक्षण करून घेऊन पिकांना खताची मात्रा देणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ व नाडेप खत युनिट योजना यामुळे शेतकरी आधुनिक तंत्राने शेती करण्यास प्रवृत्त होऊ लागले आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. त्यातच मावळातील शेतजमिनीचे भाव वाढल्याने मावळात शेतजमिनी खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले आहे. हे नवीन शेतकरी मजुरांच्या तुटवड्यावर मात करण्याबरोबरच पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसू लागले आहे. तालुका सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी मावळ कृषी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना चांगले यश येऊ लागले आहे. येथील शेतकरी भात, ऊस,बाजरी, सोयाबीन, ज्वारी, टोमॅटो, गहू, कलिंगड, कडधान्य, फळबागा, देखील गेल्या दोन-तीन वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ लागले आहेत. पॉलिहाऊस मोठ्या प्रमाणात उभारली असून, त्यातून विदेशात व देशांतर्गत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बाजारभाव बघून जरबेरा, गुलाब, झेंडू, बिजली फुलपिके पाठवली जात आहेत.
आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी शेतीसाठी उपलब्ध असलेले हवामान, बाजारभावाविषयीचे, शेतीसंबंधित माहितीचे, आधुनिक ॲपसोबत कृषी विभागाचे शेतकरी मासिक ॲप, कृषिक ॲपचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शने, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी सहल यांचा लाभ घेणे आवश्यक आहे. शेतीमध्ये हंगामानिहाय पाण्याचा स्रोत पाहून नियोजन करणे, भाजीपाला हरितगृहात लागवड करण्यास प्राधान्य देणे, रोपवाटिका अत्याधुनिक पद्धतीने करणे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेली अवजारे वापरणे, आंतरपिके घेणे, सेंद्रिय शेती करणे, पिकाची घनता समतोल ठेवणे गरजेचे आहे. शेतीचा संपूर्ण जमा-खर्च ठेवणेही आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी गट स्थापन करून एकत्रित येऊन गटशेती करणे ही आवश्यक आहे. कृषी पर्यटन हा मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायदा करून देणारा व्यवसाय आहे. पर्यटकांना पावसाळ्यात मावळात कोसळणारा धो-धो पाऊस, डोंगरदऱ्यातील धुक्याचा पाठशिवणीचा खेळ, कोसळणारे धबधबे, हिरवीगार भातखाचरे ही दृष्य पर्यटकांना भुरळ घालत असतात. थंडीमध्ये अतिशय बोचरी थंडीचा अनुभव, चांदणी भोजन, तंबूतला मुक्काम, रात्री शेकोटीवरच्या गप्पा आणि सकाळी माळावर पेटविलेल्या चुलीवरच्या वाफाळत्या चहाचे घोट घेत पाहिलेला सूर्योदय हा अविस्मरणीय अनुभव असतो. त्यामध्ये रात्री शेकोटीची ऊब घेताना गाणी, भेंड्या, काहीवेळा गाण्यावर धरण्यात येणारा नृत्याचा ठेका असे अनुभव मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतात
मावळ तालुक्याला लाभलेले निसर्गाचे भरभरून वरदान व गडकोटांचा वारसा लक्षात घेता येतील पर्यटन स्थळाच्या सुधारणा व संवर्धनातून पर्यटन व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे शेती सोबत कृषी पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे.
मावळातील अनेक प्रगतशील शेतकरी आधुनिक शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन करून अर्थार्जन करीत आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. टोमॅटोसारख्या कामगंध सापळे, पिवळ्या कार्डचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर करून आधुनिकता आणणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण घटत असल्याने पाण्याचा तुटवडा भासत असल्याने पाण्याचे सुयोग्य नियोजन करून शेती करणे काळाची गरज आहे. त्यामुळे मोकाट पद्धतीने पिकांना पाणी न देता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड करण्यास प्राधान्य गरजेचे आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन पाणलोटाच्या विविध योजनांचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शेतीला त्याचा उपयोग होणार आहे.
1)फोटो नं BBD22BO2170 :
2)फोटो नं BBD22BO2172 :
3) फोन नं BBD22BO2171 :

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares