‘सोयाबीन आणि कापसाला भाव द्या’; मंत्रालयासमोर जलसमाधी घेण्यासाठी निघालेले शेतकरी पनवेलमध्ये नजरकैदेत – Loksatta

Written by

Loksatta

सोयाबीन आणि कापसाला भाव द्यावा या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकरी मुंबईतील मंत्रालयासमोर जलसमाधी घेण्यासाठी निघाले होते. या शेतकऱ्यांना पनवेलमधील शेडुंग फाट्यावर अडवून त्यांना कर्नाळा स्पोर्टस अकादमीच्या मैदानात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पनवेल येथील परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा- उरण: ३७ कोटींचे डिझेल परतावे थकल्याने मच्छिमार आर्थिक संकटात
शेतक-यांना नजरकैदेत ठेवल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी गेले आहे. आमदार रविकांत तुपकर यांच्या पत्नीही या आंदोलकांसोबत नजरकैदेत आहेत. आ. तुपकर हे चर्चेसाठी मुंबईला गेल्याने ते परत येईपर्यंत आंदोलकांनी कर्नाळा स्पोर्टस अकादमीत दुपारचे जेवन केले. सोयाबीन आणि कापसाला भाव सरकारने द्यावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील हे शेतकरी जलसमाधीचे आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत.
मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares