Aurangabad: शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांचं जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये – ABP Majha

Written by

By: मोसीन शेख | Updated at : 22 Nov 2022 01:54 PM (IST)

Aurangabad News
Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बगडी येथे गावकऱ्यांकडून रस्त्याच्या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये ‘जलआंदोलन’ करण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. तर अनेकदा मागणी करून आणि पत्रव्यवहार करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आज जलआंदोलन केले. यावेळी शेतकरी पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले. 
बगडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या गोदावरी नदीकाठी असून नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच बॅकवॉटरचे (फुगवट्यातील पाणी) पाणी सतत आसपासच्या परिसरात व रस्त्यावर पसरते. त्यामुळे शेतात जाण्याकरिता असलेला रस्ता वाहून जातो. आजघडीला देखील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यात शेतात कापूस वेचणीसाठी आला असतांना पाण्यातून कसे जावे अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे बगडी येथील महिलांना कापूस वेचणीसाठी थर्माकलच्या तराफ्याचा वापर करून पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शेत गाठावे लागत आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून येथे मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो. मात्र, गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्याने हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तराफ्याच्या साह्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातीलअनेक गावे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे 50  वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातील लोकांना शासनाच्या वतीने मूलभूत सुविधा अद्यापही मिळाल्या नाही. तर शेतकरी, ग्रामस्थांच्या या जीवघेण्या समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी जलआंदोलन केले आहे. 
शेतकऱ्यांचे पाण्यात उतरून आंदोलन… 

News Reels
रस्त्याच्या मागणीसाठी आज बगडी गावातील ग्रामस्थांनी जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरून  ‘जलआंदोलन’ केले. यावेळी तरुण शेतकऱ्यांची देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘रस्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘नदीवर पूल झालाच पाहिजे’, ‘झोपलेल्या प्रशासनाच करायचं काय खाली मुंडके वरती पाय’, अशा घोषणा यावेळी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांकडून देण्यात आल्या. 
शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही…
जायकवाडी धरणासाठी गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर उरलेल्या जमिनीत शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र अनकेदा अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणाची पाणीपातळी वाढल्यास बॅकवॉटरचे पाणी रस्त्यावर येत असल्याने शेतात जाणारे रस्ते बंद पडतात. त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसतो. 
Aurangabad: प्रेमप्रकरणातून प्रेयसीसह स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू; मुलीवर उपचार सुरु
Kolhapur : कोल्हापुरात शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला पहिला हादरा बसण्याची शक्यता! पंचगंगा घाटावरून स्पष्ट संकेत 
Job Majha: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि ‘या’ ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज
केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना: देवेंद्र फडणवीस
Maharashtra News Updates 25 November 2022 : दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात दोन्ही गटांचे मेळावे 
Urban Naxal Case: प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना हायकोर्टानं दिलेला जामीन योग्यच, सुप्रीम कोर्टानं NIAची याचिका फेटाळली 
‘शिंदे मुख्यमंत्री झाले अन् नवस पूर्ण झाला, नवस फेडण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला’; शिंदे गटातील आमदारांनीच सांगितलं….
Sanjay Raut: ईडीनं संजय राऊतांविरोधात दाखल केलेली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार
Pravaig Defy : 500 किमी रेंज देणारी मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाटावर पंचगंगेची आरती; ‘सुमंगलम’ बोधचिन्हाचे अनावरण
महाराष्ट्राचं कर्नाटकला जशास तसं उत्तर… बेळगावसह सीमाभागातील 865 गावांतील संस्थाना आर्थिक बळ देणार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares