शेतकरी व असंघटित कामगारांच्या प्रश्नावर धरणे आंदोलन संपन्न! – AIN NEWS

Written by

Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

परळी : नुकसान झालेल्या 2022 खरीप पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना सरकट दिलाच पाहीजे अखिल भारतीय किसान सभा स्वस्थ बसनार नाही. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्याचे प्रश्न प्रशासनानी सोडवावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी बोलताना केले. अखिल भारतीय किसान सभा व सेंटर फॉर ट्रेड युनियनच्या वतीने शेतकरी व असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर शुक्रवारी म्हणजे काल परळी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कॉ.अजय बुरांडे बोलत होते.
शेतकऱ्यांना खरीप 2022 चा पिकविमा सरसगट देण्यात यावा. शेतकऱ्यांना 2022 खरीप हंगाम अग्रीम तात्काळ वाटप करा. अतिवृष्टी नुकसानीचे वाटप तात्काळ करावे, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. नागपिपरी येथील सबस्टेशनचे काम त्वरीत सुरू करावे, नागापुर येथील सबस्टेशन मधील संच तात्काळ सुरू करावे, बांधकाम कामगारांना 20 हजार रुपये बोनस द्यावा, योजनेचे लाभ अर्ज मिळाल्यावर एक महिण्याच्या आत द्यावा,2022 पर्यंत सर्वांना घरे या मोदी सरकारच्या घोषणेच अंमलबजावणी करावी, अतिक्रमीत,पडीत जमिन, गायरान जमिनी देवस्थान व गावठाणच्या जमिनीवर राहणारे शेतकरी यांचे नावावर करावी या मागण्यांसाठी किसान सभा व सिटु च्या वतीने तहसिल कार्यालया समोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माकपचे कॉ.पी.एस घाडगे, या आंदोलनाचे नेतृत्व सिटुचे कॉ.बी.जी खाडे, किसान सभेचे कॉ पांडुरंग राठोड, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ भगवान बडे, कॉ परमेश्वर गीत्ते, कॉ रूस्तुम माने, कॉ सुदामदादा देशमुख, कॉ सुदाम शिंदे, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ विष्णु देशमुख आदींनी केले. तहसिदार, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनी, विज वितरणचे अधिकारी यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.
Prev Post
नाथ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच क्रीडा कलेला प्राधान्य देते – प्रदीप खाडे!
Next Post
राहुल गांधी साधणार केंद्रावर निशाणा!
परंडा शहरात संविधान प्रस्ताविका वाचून वंचित बहुजन आघाडी कडून संविधान दिन साजरा!
लक्ष्मीबाई देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा!
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पंकजाताई मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली!
भारतीय संविधान दिन साजरा व मुंबई 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली!
श्रीनाथ हायस्कुल पैठण येथे संविधान दिन उत्साहात साजरा!
परळीत 2 डिसेंबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन!

Leave A Reply


Your email address will not be published.
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध सुरूच, पोस्टरवर शाई लावून उद्धव गटाचा निषेध!
तानाजी सावंतांच्या हस्ते वाशी येथील मुलींच्या वस्तीगृहास सोलर वॉटर…
माय लेकीच्या मृत्यूचे कारण बनली ती विहीर,पहिले मुलगी नंतर आई!
माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे उजळणी प्रशिक्षण मोठ्या उत्साहात!
Recent Posts
परंडा शहरात संविधान प्रस्ताविका वाचून वंचित बहुजन आघाडी कडून…
लक्ष्मीबाई देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन…
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पंकजाताई मुंडेंनी वाहिली…
भारतीय संविधान दिन साजरा व मुंबई 26/11 हल्ल्यातील शहिदांना…source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares