नाशिक : सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी – Agrowon

Written by

नाशिक : नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौरऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्ट्यावर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत ०.५ ते २ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौरऊर्जा प्रकल्प प्राधान्याने, शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना ही सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करु शकतात. जर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. विकासक आणि जमीनमालक यांच्यात भाडेपट्टी करार केला जाईल. त्या भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राशी थेट जोडला जाणार आहे.  प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत या योजनेमध्ये निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता काही अटी बंधनकारक राहतील. ज्यामध्ये बयाणा रक्कम१ लाख/मेगावॅट, परफॉर्मन्स बँक गॅरंटी रुपये ५लाख मेगावॉट, उद्देशीय पत्र जारी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून २५ वर्षांकरिता ३.१० रुपये प्रति युनिट दराने राहील.  या योजनेअंतर्गत महावितरणने ४४४ मेगावॉटकरिता निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची ६ डिसेंबर आहे. या योजनेत संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp  या वेबपोर्टलवर भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.  
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares