बोलून बातमी शोधा
66366
मुत्नाळ : जनजागरण पदयात्रेच्या प्रारंभप्रसंगी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी व मुत्नाळ ग्रामस्थ.
———–
भारतीय किसान संघाच्या
जनजागरण पदयात्रेला प्रारंभ
गडहिंग्लज : शेतमालाला उत्पादन खर्च अधिक लाभकारी मूल्य मिळावे, यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. याबाबत जनजागरणासाठी येथील शाखेतर्फे पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथून पदयात्रेचा प्रारंभ झाला.
शेतमालाला उत्पादन खर्च अधिक लाभकारी मूल्य मिळाले पाहिजे, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक आणि इतर निविष्ठावरील सेवा कर रद्द करावा, किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भरघोस वाढ करावी या मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने पदयात्रा काढण्यात आली. मुत्नाळ येथील हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मारकापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी उपसरपंच अक्षय पाटील, राकेश पाटील, राजू रामाज, विजय हट्टी, रोहित पाटील यांच्यासह भारतीय किसान संघाचे महामंत्री मदन देशपांडे, तालुकाध्यक्ष बसवराज हंजी, बाळगोंडा पाटील, राम पाटील, अजित नडदगल्ली, सचिन जाधव, संभाजी साळवी आदी उपस्थित होते.
म्हाकवेत लम्पीने दहा दिवसांत
चार जनावरांचा मृत्यू
म्हाकवे : येथे लम्पी आजाराने आणखी एक बैल दगावला. गावात लम्पी आजाराने एकूण चार जनावरे दहा दिवसांत दगावली आहेत. राजाराम महादेव पाटील यांचा बैल आज सकाळी लम्पीने दगावला. गेले आठ दिवस या बैलावर उपचार सुरू होते. चार जनावरे दगावल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. शासनाने तातडीने गावातील सर्व जनावारांना लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
—-
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.