पीक विम्यातील असमानता दूर करा: शेतकऱ्यांचा महावितरणसह विमा कंपनी व्यवस्थापकांना साकडे – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
चालू वर्षाचा खरीप हंगामाचा पीकविमा देताना भारतीय कृषी विमा कंपनीने विमा रक्कम वितरणात असमानता व विसंगती निर्माण केली. यातील फरक दूर करून सर्वांना सरसकट विमा वितरित करा. तसेच कृषीपंपांची वीज तोडणे थांबवण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने भारतीय कृषी विमा कंपनीच्या व्यवस्थापक व महावितरण अभियंत्याकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील शेतकऱ्यांनी २०२२ मध्ये आपल्या कंपनीकडे खरीप हंगामाचा वेळेत विमा भरला. कंपनीने दि. ३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा केली. मात्र, त्यात फारच विसंगती आहे. एकाच गट नंबरमधील २ शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असताना दुपटीपेक्षा जास्त तफावत लाभात दिसते. पंचनाम्याच्या सत्य प्रती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्या. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून न्याय द्यावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कृषीपंपाची वीज न तोडण्याचे आदेश असूनही महावितरण कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन तोडण्याचे एसएमएस करत आहेत. सततचा पाऊस नापिकी यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
त्यामुळे कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावर शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, उस्मानाबाद तालुकाप्रमुख भारत पाटील, अम्ब्रेश्वर काकडे, बळीराम एडके, रामलिंग मारकड, ओम शिनगारे, संदीप पाटील, सुनील जाधव, संजय सलगर, प्रवीण नाताळे, तुकाराम एडके, विश्वंभर पांचाळ, पोपट सलगर, अजित भोजने, उमाकांत जहागीरदार, आकाश भंडारे, उदय कुलकर्णी, दत्तात्रय बनसोडे, रामेश्वर काकडे, श्याम भारती, श्रीकांत मारकड, पंढरी कोळी, आत्माराम बंडगर, नारायण भोजने, धनंजय तवले, अनिल गायकवाड, पांडुरंग कोळी आदींसह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares