बोलून बातमी शोधा
rat०६११.txt
(पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat६p२५.jpg ः
६६९४७
तुळशी ः पर्यायी मार्गाच्या कामासाठी नेण्यात आलेली मशिनरी.
ओव्हरलोडमुळे पडलेल्या खड्ड्यांवर लाल चिऱ्याचा मुलामा
तुळशी येथे मलमपट्टी ; बायपास रस्त्याचे कामही सुरू, शेतकरी अनभिज्ञ
सकाळ वृत्तसेवा ः
मंडणगड, ता. ६ ः आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरलोड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्याची परिस्थिती पाहून हे खड्डे नेमके कोण बुजवत आहे, असा प्रश्न या मार्गावरील गावातील नागरिक उपस्थित करत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या व रस्त्याची दुरवस्था या संदर्भात तालुक्यातून अनेक तक्रारी प्रशासन व संबंधितांकडे होत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये लाल चिऱ्यांचे डबर टाकण्यात येत असून त्यावर लाल बारीक खडीचा फक्त मुलामा दिला जात असल्याने रस्त्यावर सुरू झालेले खड्डे नेमके कोण व कशासाठी बुजवत आहे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेसमोर उपस्थित झाला आहे.
महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे अथवा नाही या विषयी कोणतीही स्पष्टता स्थानिक पातळीवर होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाहतुकीमुळे सुरू झालेल्या रस्त्याची नासधूस थोपवण्यासाठी वाहतूक ठेकेदारच हे काम करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. यावर तुळशी येथे धोकादायक पुलास वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी बायपास रोडचे कामही आज हाती घेण्यात आले. त्यासाठी मशिनरी जागेवर नेण्यात आल्या; मात्र पर्यायी रस्त्याचे काम ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून केले जात आहे त्यांना या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना प्राधिकरण अथवा संबंधितांकडून देण्यात आलेली नव्हती.
या वेळी माजी जि. प. सदस्या अस्मिता केंद्रे, कौस्तुभ जोशी, कैलास धाडवे, पराग करमरकर शेतकरी उपस्थित होते. ६ डिसेंबरला दिवसभर घडलेल्या घटनाक्रमानंतरही महामार्गावर विविध प्रकारचे कामे प्राधिकरणाच्या आदेशाने सुरू झाली आहेत अथवा नाही याविषयी सुत्रांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अडचणीच्यावेळी समस्यांचे निराकरण करण्याची निवेदने दिली असूनही कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणा अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. हे काम कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न तालुकवासीय उपस्थित करत आहेत.
तहसीलदारांकडे धाव
याबाबत जागामालक शेतकऱ्यांनी जागेवर जाऊन आपला आक्षेप नोंदवला व तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन या संदर्भात योग्य रितसर कार्यवाही करण्याची मागणी केली. यानंतर सूर्यवंशी यांनी तक्रारदार शेतकरी यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे चर्चा करून आपणास योग्य ते सहकार्य करतो, असे आश्वासन दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.