चाकणमध्ये आढळला मृत महिलेचा सांगाडा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
चाकण, ता. ९ : चाकण (ता. खेड) येथील झित्राई मळ्याजवळील एका शेतजमिनीत ऊसतोड करताना मजुरांना एक हाडांचा सांगाडा दिसला. हा सांगाडा स्त्री जातीचा आहे. याबाबत सुनील गोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली.
मृतदेहाचा हाडाचा सांगाडा असून, उसाच्या शेताच्या सरीत पडलेला दिसला. हा सांगाडा अर्धवट अवस्थेतील आहे. त्यामध्ये डोक्याची कवटी, हाताचे व मांडीचे एक हाड, डोक्याच्या लांब केसांचा पुंजका, मातीत पडलेले दात, इतर थोडी बारीक हाडे बाजूला पडलेली आहेत. लहान हाडे उसाच्या शेताच्या सरीमध्ये दिसून आली. तसेच, पिवळसर रंगाचा लेडीज गाऊन व कुजलेल्या अवस्थेतील लालसर रंगाचा कपडा मातीत भरलेला दिसून आला.
येथील शेतात शुक्रवारी (ता. ९) सकाळी नऊच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊसतोड करण्यास आले होते. त्यांनी ऊसतोड करण्यास सुरवात केली, त्यावेळी त्यांना हा सांगाडा दिसला. त्यांनी ही माहिती दिली, असे शेतकरी सुनील गोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या सांगाड्याची ओळख पटलेली नाही. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलिस ठाण्याशी ०२१३५-२४९३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares